जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत कृष्णा महाजनचा बहाद्दर विजय – विभागीयसाठी निवड विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव – "ज...
जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत कृष्णा महाजनचा बहाद्दर विजय – विभागीयसाठी निवड
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव – "जिद्द असेल तर यश अटळ आहे" याचा प्रत्यय इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, धरणगाव येथील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कृष्णा गोरख महाजन याने जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत दाखवून दिला. प्रताप कॉलेज, अमळनेर येथे झालेल्या स्पर्धेत ७३ किलो वजनी गटात त्याने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम सामन्यात त्याने चाळीसगाव येथील खेळाडूचा पराभव करून विजेतेपद मिळवले आणि आपली छाप पाडली.
कृष्णाच्या या यशामुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा नाशिक येथे होणार आहे. कृष्णाने यशाचे श्रेय सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन यांना दिले.
संस्थेचे चेअरमन डी.जी.पाटील,सचिव सी.के. पाटील,संचालक मच्छिंद्र पाटील,भरत पाटील,प्राचार्या सुरेखा पाटील, पर्यवेक्षक ए.एस. पाटील तसेच मार्गदर्शक जेष्ठ क्रीडाशिक्षक डी.एन. पाटील यांनी कृष्णाचे मनःपूर्वक अभिनंदन करत विभागीय पातळीवरही यश मिळवावे, अशी शुभेच्छा दिली.
या विजयामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून कृष्णाच्या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.

No comments