यावल येथे 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रावण दहन काल्पनिक फाईल चित्र भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) साला बादाप्रमाण...
यावल येथे 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रावण दहन काल्पनिक फाईल चित्र
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
साला बादाप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यावल तर्फे रावण दहन कार्यक्रम दिनांक 2 ऑक्टोबर २५ गुरुवार रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास व्यास मंदिर जवळ नदीपात्रात आयोजित करण्यात आलेला आहे. यावल रावेर तालुक्याचे आमदार श्री अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रमुखअतिथी म्हणून माजी आमदार श्री शिरीष दादा चौधरी प्रहार संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री अनिल भाऊ चौधरी गोदावरी फाउंडेशनचे सौ केतकीताई पाटील प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग यावल श्री अरुण पवार श्री श्रीराम दयाराम पाटील उद्योजक श्री रोग तज्ञ तथा आश्रय फाउंडेशन यावल अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी धनंजय चौधरी माजी नगराध्यक्ष यावल अतुल पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थितीत प्रांत तहसीलदार डीवायएसपी पोलीस निरीक्षक व विविध पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत . या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजक समितीतर्फे अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले कार्याध्यक्ष डॉक्टर हेमंत येवले उपाध्यक्ष अमोल भिरूड कोषाध्यक्ष विवेक सोनार सचिव अमोल दुसाने व समितीचे सर्व सदस्य गण आणि सल्लागार समिती व स्थानिक समिती यांनी कळविले आहे .
No comments