बहिणाबाई चौधरी मराठी साहित्यातील अजरामर कवयित्री.. प्रा. सोनाली पाटील भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा...
बहिणाबाई चौधरी मराठी साहित्यातील अजरामर कवयित्री.. प्रा. सोनाली पाटील
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत प्रा. सोनाली पाटील यांच्या व्याख्यानाने पाचवे पुष्प गुंफण्यात आले.
'मराठी साहित्यातील अजरामर कवयित्री : बहिणाबाई चौधरी' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या व्याख्यानास उपप्राचार्य डॉ.एच.जी.भंगाळे यांच्यासह प्रा.डॉ. आर.डी. पवार विचारपीठावर उपस्थित होते.
प्रा. सोनाली पाटील यांनी आपल्या व्याख्यानात बहिणाबाई चौधरींना अक्षर ओळख नसूनही त्या जे दिसेल त्याचे निरीक्षण करून कविता रचायच्या.त्यांनी खान्देशी भाषेत आष्टाक्षरी छंदातून कविता रचल्या.
त्यांच्या कवितांना आचार्य अत्रे यांनी बावनकशी सोन्याची उपमा दिली असे सांगितले. उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बहिणाबाई निरक्षर असूनही त्यांच्याकडे शब्दसंग्रह खूप मोठा होता आणि त्याच्या आधारावरच त्यांनी कविता रचल्यात असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.वैशाली कोष्टी यांनी केले तर आभार प्रा.नरेंद्र पाटील यांनी मानले.यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक उपस्थित होते.

No comments