ते चौघे हद्दपार असतानाही बिन्दास्त फिरत होते एमआयडीसी हद्दीत..अखेर एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून पकडलेच सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -...
ते चौघे हद्दपार असतानाही बिन्दास्त फिरत होते एमआयडीसी हद्दीत..अखेर एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून पकडलेच
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.६):-गणेशोत्सव कालावधीत एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतुन हददपार असणारे चार सराईत आरोपी हद्दपार असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरताना आढळून आल्याने पोलिसांनी पाठलाग करत आरोपीना पकडत पोलीस ठाण्यात चौघा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक उर्फ भोऱ्या अरविंद भिंगारदिवे,आशिष अंतोन पाटोळे,विशाल भाऊसाहेब पाटोळे,अजय उर्फ मठ्ठया सोमनाथ गुळवे असे पकडलेल्या आरोपींचे नावे आहेत.सदरचे आरोपी हे अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री. शिरीष वमने यांच्या मार्गदर्शानाखाली एमआयडीसी सपोनि.श्री.माणिक बी.चौधरी, सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ. राजु सुद्रीक,पोहेकॉ.सचिन आडबल,पोहेकॉ.संदीप पवार, पोकॉ.किशोर जाधव,पोकॉ. नवनाथ दहिफळे,पोकॉ.ज्ञानेश्वर आघाव यांच्या पथकाने केली आहे.

No comments