अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – मदतीची मागणी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर तालुक्यातील लोनवडी गावात झ...
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – मदतीची मागणी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर तालुक्यातील लोनवडी गावात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. १५ ते १६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून उभे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या संदर्भात ग्रामपंचायत लोनवडी तर्फे भारत सरकारच्या खासदार तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. रक्षाताई खडसे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून शासनाने त्वरीत पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

No comments