adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विश्वकर्मा समाजातील कार्पेंटर बांधव यांना लकी ड्रॉ मार्फत कटर मशीन व ड्रिल मशीन वाटप होणार.

 विश्वकर्मा समाजातील कार्पेंटर बांधव यांना लकी ड्रॉ मार्फत कटर मशीन व ड्रिल मशीन वाटप होणार  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि...

 विश्वकर्मा समाजातील कार्पेंटर बांधव यांना लकी ड्रॉ मार्फत कटर मशीन व ड्रिल मशीन वाटप होणार 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक १७/०९/२०२५ वार बुधवार रोजी सकाळी 11 वाजता प्रभू श्री विश्वकर्मा भगवान यांच्या पूजन दिवसानिमित्त महाबळ येथील हतनुर वसाहत हॉल या ठिकाणी विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठान या संघटनेच्या मार्फत विश्वकर्मा समाजातील कारपेंटर बांधव यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून ड्रिल मशीन व कटर मशीन वाटप करण्यात येणार आहे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र निकम, उपाध्यक्ष विकास पाथरे, सचिव कैलास देवरे यांनी कळविले आहे


विश्वकर्मा समाजातील समाज बांधवांना चांगले व्यासपीठ मिळावे अशी संकल्पना राजेंद्र निकम यांनी सुचवलेली आहे, त्यामुळे जळगाव शहरात विविध क्षेत्रात विश्वकर्मा समाजातील समाज बांधव आहेत त्यातील व्यापारी बांधव, कार्पेंटर कॉन्ट्रॅक्टर, कंट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र करून राजेंद्र निकम हा कार्यक्रम घडवून आणत आहेत, त्यामुळे समाज एकत्र होऊन प्रगतीशील होईल असे निकम म्हणाले. लकी ड्रॉ मध्ये ज्यांनी नोंदणी केलेली आहे, त्यांनाच ड्रिल मशीन व कटर मशीन यांचा लाभ घेता येईल, हा कार्यक्रम फक्त जळगाव जिल्हा पुरता मर्यादित आहे.


राजेंद्र एस निकम

संस्थापक अध्यक्ष

विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठान.

No comments