adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुर्गामाता दौड मार्गावर रांगोळी प्रकरणी तणाव,मुस्लिम समाजाचा रास्तारोको;पोलिसांचा लाठीमार, २२ जण ताब्यात

 दुर्गामाता दौड मार्गावर रांगोळी प्रकरणी तणाव,मुस्लिम समाजाचा रास्तारोको;पोलिसांचा लाठीमार, २२ जण ताब्यात   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:...

 दुर्गामाता दौड मार्गावर रांगोळी प्रकरणी तणाव,मुस्लिम समाजाचा रास्तारोको;पोलिसांचा लाठीमार, २२ जण ताब्यात  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२९):- शहरात दुर्गामाता दौड मार्गावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशी रांगोळी काढल्याने शहरातील वातावरण चांगलेच तापले. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने कोठला स्टँड चौकात रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे पुणे–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.

शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे धर्मगुरुंबाबत आक्षेपार्ह रांगोळी रस्त्यावर काढल्याने दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात आरती संग्राम रासकर व संग्राम रासकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कोठला स्टँड येथे आंदोलन करणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी बाळाचा वापर करून जमावाला पांगवले व रस्ता मोकळा केला. या कारवाईत सुमारे 30 ते 35 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तणाव वाढू नये म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात असून तणावग्रस्त भागात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

No comments