ग्रामपंचायत वसारी येथील फासे पारधी बांधवांनी घरकुलासाठी दिलेल्या आत्मदहनाच्या निवेदन संदर्भात चर्चा वाशिम प्रतिनिधी (संपादक -:- हेमक...
ग्रामपंचायत वसारी येथील फासे पारधी बांधवांनी घरकुलासाठी दिलेल्या आत्मदहनाच्या निवेदन संदर्भात चर्चा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नुकतेच ग्रामपंचायत वसारी येथील फासे पारधी बांधवांनी घरकुलासाठी आत्मदहनाचा इशारा संबंधीत निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब यांना सादर केल असून यानिमित्ताने शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ग्रामपंचायत वसारी येथील फासेपारधी समाजाच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून चौकशी कामी आलेलो आहोत तरी तुम्ही सादर केलेल्या निवेदनात ज्याकाही मागण्या आहेत त्या आम्हाला तुम्ही सांगा असे सांगत शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पारधी समाजाचे अध्यक्ष वाशिम जिल्ह्याचे शंकू गोविंदा पवार यांनी ठाणेदार यांचेशी चर्चा केली व माननीय जिल्हाधिकारी साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, यांनी आमच्या घरकुलाच्या आटी मंजूर करण्यात यावेत यानंतर आम्ही आमचे आत्मदहनाचा निर्णय मागे घेऊ असे ठाणेदार यांना सांगितले.

No comments