चोपडा येथिल भारत फायनान्स इंडसइंड बँक शाखेत साडे अकरा लाखाचा अपहार चोपडा शहर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल.. चोपडा प्रतिनिधी (संप...
चोपडा येथिल भारत फायनान्स इंडसइंड बँक शाखेत साडे अकरा लाखाचा अपहार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील भारत फायनान्सशियल इन्कूलजन लिमीटेड शाखा चोपडा येथे फिल्ड असीस्टंट म्हणून कार्यरत असतांना त्यांचे काम फिल्ड वर जावून कलेक्शनची रक्कम जमा करुन ती रक्कम कार्यालयात रोखपाल कडे जमा करणे असे असतांना यातील आरोपी कैलास भागचंद राठोड (वय 26 वर्ष) गणेशनगर खडकी ता एरंडोल जि. जळगाव,कल्पेश संतोष पाटील-(वय-25) वर्ष रा भालगाव ता एरंडोल जि. जळगाव,दिगंबर अभिमान खिल्लले (वय.28) यांनी संगनमत करुन दिनांक 06/01/2023 ते दिनांक 23/08/2024 या कालवधी मध्ये कंपनीचे कर्जदार सदस्यांकडून कलेक्शन हप्त्याची रक्कम कंपनी कार्यालयात रोखपाल यांचे कडे जमा न करता आरोपी कैलास भागचंद राठोड (वय.26 वर्ष) रा गणेशनगर खडको खुर्द ता. एरंडोल जि जळगाव याने 21 ग्राहकांची हप्त्याची रक्कम 07,34,304/- रु तसेच आरोपी कल्पेश संतोष पाटील (वय-25 वर्ष) रा भालगाव ता एरंडोल जि जळगाव याने 14 ग्राहकांची हप्त्याची रक्कम 02,79,732/- रु तसेच आरोपी दिगंबर अभिमान खिल्ले (वय-28 वर्ष) रा अनफवाडी पोस्ट आर्वी ता. जि. धुळे याने सुध्दा 14 ग्राहकांची 01,38,503/- रु अशी ग्राहकांकडुन जमा एकूण 1152539/-रुपये हप्त्याची रक्कम बँकेच्या कार्यालयात न जमा करता संगनमत करुन स्वताः जवळ ठेवुन त्या रकमेचा आपल्या दैनंदिन जिवनात स्वताःच्या फायद्यासाठी वापर करुन बॅंकेचा तसेच कर्जदार (ग्राहक) यांचा विश्वास संपादन करून विश्वासघात तसेच फसवणुक केल्या प्रकरणी वासुदेव कैलास पाटील (वय-28 वर्ष) ब्रंच मेनेजर भारत फायनान्स इंडसइंड बैंक रा. शनिमंदीर चौक पारोळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2), 316(5) 3(5) प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चोपडा पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांच्या मार्गदर्शखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे हे करीत आहे.

No comments