adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी अतिवृष्टीने बाधित नुकसानीची केली पाहणी...

 माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी अतिवृष्टीने बाधित नुकसानीची केली पाहणी...  लातूर जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ओ...

 माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी अतिवृष्टीने बाधित नुकसानीची केली पाहणी... 


लातूर जि. प्र. (उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

ओला दुष्काळ जाहीर करून तत्परतेने सरसकट आर्थिक मदत शेतक-यांना देण्यात यावी अशी सरकारकडे केली मागणी

लातूर :– मे 2025 पासून सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील विविध भागात शेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन व अन्य पिके खराब झाली आहेत, घरात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी घरांचे देखील नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी लातूर ग्रामीण मधील एकुर्गा, भेटा, बोरगाव नकुलेश्वर, निवळी शिराळा आदी गावांमध्ये जाऊन अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्षपणे पाहणी केली व शेतक-यांना धिर दिला. यावेळी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे संबंधीची माहिती जाणून घेतली व या संबंधी योग्य त्या सूचना केल्या.

बाधीत क्षेत्राचे पंचनामे करत असताना ते अचूक व वेळेवर होणे गरजेचे असून याची काळजी घ्यावी,यासाठी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी देखील प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करतील असे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हा खूप मोठ्या संकटात सापडला आहे. म्हणून ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे अशी मागणी करून यासाठी काँग्रेसपक्ष प्रयत्नशील राहणार असून वेळप्रसंगी या मागणी साठी आंदोलन करण्याची वेळ आली तर ते देखील करण्याची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नुकसानाची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरत असताना त्यात काही अडचणी येत असतील तर ऑफलाइन पद्धतीने देखील माहिती भरण्याची सोय प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी.झालेले नुकसान हे अतोनात असून शेतकऱ्यांनी हताश होऊ नये, सर्व काँग्रेसजण शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिला.या पाहणी प्रसंगी २१ शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,विलास कारखाना संचालक रविंद्र काळे, रेणा कारखाना व्हा चेअरमन प्रविण पाटील,संतशिरोमणी कारखाना चेअरमन शाम भोसले,श्रीनिवास शेळके, रेणापूर बाजार समिती उपसभापती शेषराव हाके, संचालक प्रकाश सुर्यवंशी, अनुप शेळके, रंजीत पाटील, सचिन पाटील, वीरसेन भोसले,तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके आदींची उपस्थिती होती.

No comments