adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"आदिवासी मुलांचा खेळोत्सव"; रविवारपासून बिटस्तरिय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

 "आदिवासी मुलांचा खेळोत्सव"; रविवारपासून बिटस्तरिय क्रीडा स्पर्धांचे आयोजन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प्रकल्प क...

 "आदिवासी मुलांचा खेळोत्सव"; रविवारपासून बिटस्तरिय क्रीडा स्पर्धांचे आयोजन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

प्रकल्प कार्यालय,यावल यांच्या अंतर्गत चोपडा बीटातील क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ दिनांक २१ रोजी होणार आहे.या स्पर्धेत १४,१७,१९ वर्षे आतील विद्यार्थी सहभागी होणार असून मोठ्या उत्साहात खेळांच्या मैदानावर स्पर्धा रंगणार आहेत.

सालाबादप्रमाणे अपर आयुक्त कार्यालय नाशिक यांच्या पूर्वसूचनेनुसार आणि प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा येथील पटांगणावर वैयक्तिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत १०० मीटर,२०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर धावण्याच्या शर्यती, लांब उडी,गोळाफेक,भाला फेक, थाळी फेक आदी स्पर्धा घेण्यात येतील.तसेच दिनांक २४ व २५ सप्टेंबर रोजी सांघिक स्पर्धा ह्या  देवझिरी ता.चोपडा येथील शासकीय आश्रमशाळेत पार पडणार आहेत.

चोपडा बीटातील आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये खेळांविषयी उत्साह निर्माण व्हावा आणि त्यांना व्यासपीठ मिळावे हा या स्पर्धांचा उद्देश असल्याची भावना कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे यांनी व्यक्त केली आहे. शालेय स्तरावरूनच क्रीडाक्षेत्रात पुढे जाणाऱ्या मुलांना या स्पर्धा उपयुक्त ठरणार आहेत.स्पर्धा  निकोप वातावरणात पार पडाव्या यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी,विविध आश्रमशाळांचे मुख्याध्यापक,क्रीडाशिक्षक, अधीक्षक व इतर इतर कर्मचारी यांची विविध समिती अंतर्गत जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

No comments