सनराइज किड्स स्कुल अडावद येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी अडावद ता चोपडा येथील सनराइज स्कुल मध्ये शिक्षक दि...
सनराइज किड्स स्कुल अडावद येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
![]() |
| अडावद ता चोपडा येथील सनराइज स्कुल मध्ये शिक्षक दिना निमित्त . विद्यार्थी शिक्षक व शिक्षीका झाले तसेच मुख्याध्यापिका पूनम बोरसे मोनाली पाटील हर्षदा चौधरी अश्विनी चौधरी व विद्यार्थी |
अडावद प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद ता चोपडा येथील गगनभेद बहुउद्देशीय संस्था संचलित सनराइज किडस स्कुल अडावद येथे आज डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सनराइस स्कुलचे चेअरमन श्याम महाजन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रोहिदास मोरे होते सुरुवातीला प्रमुख अतिथीच्या हस्ते डॉ राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि दीप प्रज्वलन करून कार्यकमाला सुरुवात करण्यात आली
शाळेतील लहान मुले अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आकर्षीत वेशभूषा साकारल्या होत्या भार्गवी कैलास गुरव या विद्यार्थिनीने सवित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली तेजस माळी याने महात्मा ज्योतीराव फुले यांची वेशभूषा साकारली रिद्दी चव्हाण यांनी शाळेतील मुख्याध्यापक यांची वेशभूषा साकारली होती यावेळी सनराइस किड्स स्कुलचे चेअरमन शाम महाजन व रोहिदास मोरे व मुख्याध्यापिका पूनम बोरसे यांनी शिक्षक दिना निमित्त विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली मुख्याध्यापिका पूनम बोरसे यांनी सुत्रसंचलन केले व आभार मोनाली पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी हर्षदा चौधरी अश्विनी चौधरी यांनी सहकार्य केले

No comments