सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर उमटविला ठसा भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ...
सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर उमटविला ठसा
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल दिनांक 2 सप्टेंबर रोजी यावल तालुक्यात तालुकास्तरीय ॲथलेटिक स्पर्धा फैजपूर येथे आयोजित करण्यात आली होती .यात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता .यात विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम समर्पण आणि खेळाडू वृत्तीं ने अनेक बक्षिसे जिंकली
या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील 80 मीटर हर्डल्स या यात सुलतान तडवी या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला 17 वर्षाखालील खेळात ट्रिपल जंप मध्ये ईशान तडवी याने प्रथम क्रमांक मिळवून बक्षीस पटकवले 17 वर्षाखालील वयोगटात 400 मीटर हर्डल्स खेळामध्ये अबू बकर या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकावून स्थान मिळविले तर सतरा वर्ष वयोगटातील 4 x 400 मीटर रिले टीम मध्ये सरदार वल्लभभाई पटेल स्कूल ने दुसरा क्रमांक पटकावत बक्षीस प्राप्त केले .
तर 17 वर्षे वयोगटात रेहान विनोद तडवी या विद्यार्थ्याने उंच उडी मध्ये तृतीय स्थान मिळविले व 19 वर्षे वयोगटात 400 मीटर हर्डल्स मध्ये रियाज कमाल तडवी या विद्यार्थ्याने व्दितीय क्रमांक मिळविला आणि 19 वर्ष वयोगटांमध्ये ट्रिपल जंप या खेळ प्रकारात रियाज तडवी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा शिक्षक सय्यद इरतेकाज सर यांनी परिश्रम घेतले. या सर्व विजेते विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉ .श्री प्रदीप माहेश्वरी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिला तायडे मॅडम यांनी कौतुक केले व क्रीडा शिक्षक सय्यद इरतेकाज सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

No comments