साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती हाडगा येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली... लातूर जि. प्र.(उत्तम माने) (संपा...
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती हाडगा येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली...
लातूर जि. प्र.(उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक २५/८/२०२५ रोजी डॉ. साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने हाडगा गावामध्ये साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचे पूजन करून खालील मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यावेळी गावच्या सरपंच सौ. सन्माननीय अन्नपूर्णा ताई आत्माराम वाघमारे यांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यामध्ये गावातील बरेचशे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मा. सरपंच उत्तमराव लासुणे मजूर फेडरेशनचे मा. अध्यक्ष ज्ञानोबा सूर्यवंशी, ज्येष्ठ समाजसेवक तथा रिटायर्ड कंडक्टर प्रभूजी सूर्यवंशी, मा. सरपंच भिवाजी सूर्यवंशी, ग्रामपंचायत मागासवर्गीय सदस्य वामन धाकडे व तसेच क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदजी सूर्यवंशी, जयंती समितीचे अध्यक्ष बळवंत सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, माहेश सूर्यवंशी, राहुल धाकडे ,नंदकुमार धाकडे, जयंती समितीचे उपा.आधक्ष राम जाधव जयंती, समितीचे सदस्य बालाजी जाधव, इंजि. शुभम सूर्यवंशी, लक्ष्मण जाधव, त्र्यंबक जाधव, लक्ष्मण जाधव, प्रेम सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, ओम सूर्यवंशी, मोगरगेचे प्रमुख अतिथी म्हणून आलेले सन्माननीय सुनीलजी लोंढे लिंबराज सूर्यवंशी, व बौद्ध समाजातील उपासक उपाशी का व मातंग समाजातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देत हलकी पथकाच्या तालावर सर्व समाजातील महिला वर्ग पुरुष वर्गणी ठेका धरला हलकी कला पथकाच्या वतीने गावामध्ये हलकीच्या वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वेगवेगळ्या कला हलकी पथकाच्या माध्यमातून करून दाखवण्यात आल्या त्यामध्ये गावातील बरेचसे लोक बघत असताना दिसली गावामध्ये गेली पाच वर्षापासून बंद असलेली समाजातील जेष्ठ म्हणून जयंती गोविंद सूर्यवंशी, प्रभू सूर्यवंशी, ज्ञानोबा सूर्यवंशी, यांच्या पुढाकाराने जयंती यावर्षी सर्व समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन ते पार पडली त्याबद्दल मातंग समाज व गावातील सर्व प्रतिनिधी नागरिकांचे धन्यवाद त्यावेळी गोविंद सूर्यवंशी यांनी दिले. गोविंद सूर्यवंशी यांचा जयंती समितीच्या सर्व सदस्यांना मुलाचा सल्ला देऊन जयंती साजरी करण्यात आली. मिरवणूक हे रात्री नऊ वाजता संपली. त्यामध्ये सर्व समाजातील लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला आला. त्यामध्ये पत्रकार परमेश्वरजी शिंदे यांचाही मोलाचा वाटा त्यामध्ये होता अशा प्रकारे हाडगा या गावात मध्ये जयंतीची सांगता झाली.

No comments