adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात गणराया पाचव्या दिवशी निरोप ७१ सार्वजनिक मंडळामार्फत धुमधडाक्यात "गणपती बाप्पा "चे विसर्जन..

  चोपड्यात गणराया पाचव्या दिवशी निरोप ७१ सार्वजनिक मंडळामार्फत धुमधडाक्यात "गणपती बाप्पा "चे विसर्जन..  चोपडा प्रतिनिधी  (संपादक -...

 चोपड्यात गणराया पाचव्या दिवशी निरोप

७१ सार्वजनिक मंडळामार्फत धुमधडाक्यात "गणपती बाप्पा "चे विसर्जन.. 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : शहरात पाचव्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन होत असल्याने शहरातील गणपती बाप्पा चे जवळपास ७१ सार्वजनिक गणेश मंडळतर्फे  निरोप देण्यात आला.तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि गुलालाची उधळण करीत जोशपूर्ण ढोल ताशांच्या निनादात गणपती विसर्जन शहरात रात्री उशिरापर्यंत संपन्न झाले. यावर्षी ५० च्यावर गणेश मंडळ पदाधिकारी यांचेकडून २० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती असल्याने मिरवणुकीस कसरत करून पार करावी लागली.


मेन रोड चे काँक्रीटीकरण झाल्याने या वर्षी मिरवणुकीसाठी सोयीचे झाले.विसर्जन मिरवणुकीत मनसे चे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांचा गणपती सर्वात प्रथम सकाळी साडेनऊ वाजताच विसर्जन मार्गावरून मार्गस्थ झाला.तरी जवळपास   १८ ते २० तास चालणारी ही मिरवणूक खऱ्या अर्थाने सायंकाळी पाच वाजेपासून सुरू होते.गणपती विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आशा टॉकीज,गोल मंदिर,चावडी,बोहरा गल्ली,मुस्तफा बाबा,मशीद,आझाद चौक,पाटील दरवाजा,बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बस स्टँड या मार्गे नेहमीप्रमाणे पार पडली.

गणपती विसर्जनाची मिरवणूक बोहरा गल्लीमध्ये रेंगाळत रेंगाळत सरकत होती. त्या ठिकाणी गणपती मंडळे लवकर पास होत नसल्याने यावर्षी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी कसब पणाला लावून मंडळ कार्यकर्त्यांना पुढे सरकवत नेले होते.  

तालुका भरातून ग्रामीण भागातील प्रचंड भाविक भक्त या विसर्जन मिरवणुकीला पाहण्यासाठी आलेले होते. त्यामुळे गर्दीला उधान आलेले होते.शहरातील अरुंद गल्यांमुळे मिरवणुकीला खोळंबा होत असतो. त्यामुळे मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत संपू शकत नाही, परंतु यावर्षी शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी रात्री १२ वाजे पर्यंत मिरवणूक आटोपण्यासाठी प्रयत्न केले.नंतर वाजंत्री वाजवली तर गुन्हे दाखल होतील आणि कोणतीही वाजंत्री वाजवता येणार नाही असा इशारा दिला होता. 


चोपडा शहराला छावणीचे स्वरूप या बंदोबस्तानंतर प्राप्त झालेले होते. शहरातील गणपती मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी शहर पोलिसांना शांतता कमिटीचे सर्व सदस्य,सर्वपक्षीय प्रमुख नेते,सर्व पक्षाचे पदाधिकारी,पोलीस पाटील संघटना,पोलीस मित्र,शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांचे सह ग्रामीण पोलीस स्टेशन चे अधिकारी पोलीस कर्मचारी हे मिरवणुकीत सहभागी झाले होते.विविध पक्षांचे मंडळ पदाधिकारी यांना शुभेच्छा देणारे स्टॉल्स उभारण्यात आले होते.सर्व पक्षांचे स्वतंत्र असे शुभेच्छा स्टॉल्स लावण्यात आले होते.प्रत्येक मंडळ अध्यक्षांचा गुलाबपुष्प,श्रीफळ आणि ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला.काँग्रेस,राष्ट्रवादीचे फूट पडलेले दोन्ही गटांचे,शिवसेना पक्षाचे दोन्ही गटांचे,भाजपाचे आणि नगर पालिकेचे अधिकाऱ्यांमार्फत शुभेच्छा स्टॉल्स लागलेले होते.विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे,माजी आमदार लताताई सोनवणे,माजी आमदार कैलास पाटील,माजी आमदार जगदीश वळवी,साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रासभाई गुजराथी,काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील,भाजपाचे माजी सभापती आत्माराम म्हाळके,डी.पी.साळुंखे,पप्पू पाटील, महाजन,राकेश पाटील,किशोर चौधरी,संजीव सोनवणे,प्रदीप पाटील,नंदकिशोर सांगोरे,राजेंद्र बिटवा आदी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक महेश्वररेड्डी,अप्पर अध्यक्ष कविता नेरकर,उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप,स्थानिक गुन्हे शाखेत नुकतेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड ठाण मांडून दरम्यान विसर्जन मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.चोपडा शहर पोलिस निरीक्षक,मधुकर सावळे,यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व  होमगार्ड तसेच चोपडा ग्रामीण पोलिस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व होमगार्ड चौक बंदोबस्त करिता उपस्थित होते.

प्रतिक्रिया 

जयेश भोंगे स्वच्छता निरीक्षक, चोपडा नगर परिषद 

चोपडा नगर परिषद तर्फे पहाटे ०५.३० वाजेपासून मुख्याधिकारी राहुल पाटील यांचा मार्गदर्शन खाली स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे,व्हि.के पाटील व दीपाली साळुंखे सर्व मुकादम व ७० स्वच्छता कर्मचारी ४ ट्रॅक्टर १ जेसीबीच्या मदतीने शहरातील गांधी चौक,मेन रोड,आझाद चौक भागातून रस्त्यावर पडलेला गुलाल पहाटे पाच वाजेपासून गोळा करण्यास सुरुवात केली पहाटे १० ट्रॅक्टर गुलाल गोळा करण्यात आले होते अजून दहा ट्रॅक्टर गुलाल गोळा होईल.

No comments