adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ मिळावेत म्हणून गोधडी मुक्काम आंदोलन बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

  शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ मिळावेत म्हणून गोधडी मुक्काम आंदोलन बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचा आक्रमक पवित्रा   अमोल बावस्कार ब...

 शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ मिळावेत म्हणून गोधडी मुक्काम आंदोलन

बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचा आक्रमक पवित्रा  


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर (ता.17सप्टेंबर) – मलकापूर तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. शेतकऱ्यांच्या या न्याय्य हक्कासाठी बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत गोधडी मुक्काम आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांनी केले. 


रॅलीसह कृषी अधिकारी कार्यालयावर ठिय्या

या आंदोलनाची सुरुवात पंचमुखी हनुमान मंदिर, मलकापूर येथून रॅलीने झाली. घोषणाबाजी करत रॅली कृषी अधिकारी कार्यालयावर पोहोचली. तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की, “शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत आम्ही येथून उठणार नाही.” त्यानंतर रात्रभर कार्यालयात मुक्काम ठोकण्यात आला.

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी “पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा”, “जय जवान जय किसान” अशा जोरदार घोषणा देत वातावरण ढवळून काढले. संध्याकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन घेऊन शेतकऱ्यांनी शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

विविध संघटनांचा पाठिंबा

या आंदोलनाला विविध पक्ष व संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. क्रांतिकारी शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सहभागी होत शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ दिले. हाजी रशीद खान जमादार, ॲड. साहेबराव मोरे, मंगलाताई पाटील, संदीप बहुरूपे, अजय टप, निलेश नारखेडे यांसह अनेकांनी सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी केली.

मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती

आंदोलनामध्ये सहभागी होऊन कृषी अधिकारी यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा टाकावा ही मागणी केली. 

आंदोलन करतेवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी रशिदखा जमादार, ॲड साहेबराव मोरे, मंगलाताई पाटील ,सोपानराव शेलकर, राजू पाटील, अनिल भारंबे ,रईस जमादार, बंडू चौधरी, गिरीश देशमुख,ज्ञानेश्वर डांबरे , किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू जवरे, इंजी. विष्णू क्षीरसागरअनिल मुंधोकार ,संदीप बहुरूपे, अतुल खोडके, शेख अयुब जमादार,शे .कलीम, इमरान जमदार, डॉ. राजेंद्र राऊत, गोविंदराव रहाटे, फिरोज खान, अनिल बगाडे, ॲड.सम्यक चवरे, अशोकराव मराठे, कल्पनाताई पाटील,अशोक जाजू, नंदकिशोर धोरण,कैलास ताठे, गजानन भारंबे,शेख सादिक,गोपाल रायपूर, निलेश झांबरे,शेतकरी संघटनेचे दामोदर शर्मा ,रणजीत डोसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश नारखेडे, बाळूभाऊ ठाकरे, चक्रधर बावस्कर, गोपाल सातव, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल राऊत, सचिन शिंगोटे ,प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय टप, श्रीकृष्ण भगत , बळीराम बावस्कर, या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेतकरी म्हणून रामचंद्र बोराडे, सुभाष खर्चे, नंदकिशोर देशमुख, जगन्नाथ मालठाणे, प्रकाश म्हैसागर, गणेश लांडे , हरिभाऊ म्हैसागर, श्रीकृष्ण म्हैसगार,भास्कर मालठाने, प्रभाकर मालठाणे, रघुनाथ वैतकार, गजानन आढाव बाजीराव खोडके,ज्ञानेश्वर खराडे, गोपाल कावस्कर ,निवृत्ती वाघोदे, श्रीधर गारमोडे,अनिल घाटे, गोपाल घाटे ,श्याम सिंग गोट, मारुती आमले, नीलकंठ मालठाने ,बळीराम मालठाने, प्रेमनाथ मुकुंद, सुरेश गारमोडे ,सुधाकर तायडे, जगदीश कोलते, संजय महल्ले, सारंगधर काळे, करीम खान, अरुण अनवेकर, घनश्याम तायडे, सुनील पाटील, शिवाजी तायडे , रामदास तायडे ,अरुणराव तायडे,कमलेश तायडे रोशन देशमुख बादल सिंह राजपूत  यांचे सह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

रात्रीही पाठिंबा वाढला

आंदोलनस्थळी रात्री उशिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामकुमार राठी, किसान काँग्रेस प्रदेश सचिव जाबीर भाई, ॲड. जावेद कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन जगताप, अजंम कुरेशी, आकाश भोईटे, समीर खान यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांनी इशारा दिला की, शासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा केले नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. आज संध्याकाळी पुन्हा साडेचार वाजता सर्व शेतकरी कार्यालयावर हजेरी लावून गोधडी मुक्काम आंदोलन सुरू ठेवणार आहेत.

No comments