adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा परिषद उर्दु शाळेला १५वा वित्त आयोग निधी देण्यात ग्रामपंचायत चा दुजाभाव ? मोठा वाघोदा येथील अल्पसंख्याक समाजाचे आरोप!

  जिल्हा परिषद उर्दु शाळेला १५वा वित्त आयोग निधी देण्यात ग्रामपंचायत चा दुजाभाव ? मोठा वाघोदा येथील अल्पसंख्याक समाजाचे आरोप!   रावेर प्रतिन...

 जिल्हा परिषद उर्दु शाळेला १५वा वित्त आयोग निधी देण्यात ग्रामपंचायत चा दुजाभाव ? मोठा वाघोदा येथील अल्पसंख्याक समाजाचे आरोप!  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील जिल्हा परिषद  उर्दू शाळेसाठी सोयीसुविधा व शैक्षणिक उपाययोजनांसाठी  तरतूद असलेल्या १५वा वित्त आयोगाच्या निधी खर्चात दूजाभाव केले जात असल्याचे,व गेल्या 3 वर्षांपासून १५ वा वित्त आयोगाच्या विविध शैक्षणिक उपाययोजनांसाठी पंचवार्षिक आराखड्यात एकाही शाळेतील सोयीसुविधा अथवा उपाययोजना किंवा विकास कामांसाठी तरतूद करण्यात आलेली नाही नसल्याचे? व ग्रामपंचायत निधी खर्चात दुजा भाव करीत असल्याचे? आरोप मोठा वाघोदा बुद्रुक अल्पसंख्याक समाजाचे ग्रामपंचायत सदस्यांसह समाज बांधवांनी केले आहेत मोठा वाघोदा बुद्रुक येथील जिल्हा परिषद इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असलेली गावाची एकमेव उच्च प्राथमिक शाळेत या सलग तीन वर्षे उलटली तरी १५वा वित्त आयोगाच्या निधीतून विद्यार्थी अथवा शाळेकरीता मुलभूत सुविधांसाठी निधी ची आराखड्यात तरतूद न करणे निधी खर्च न करणे या बाबींमुळे ग्रामपंचायत चे सरपंच पदाधिकारी ग्राम पंचायत अधिकारी या बाबतीत उदासीन असल्याचे बोलले जात आहे त्यांच्या या उदासिनतेमुळे अल्पसंख्याक समाजाने नाराजी व्यक्त करीत रोष व्यक्त केले जात आहे 

 गेल्या तीन वर्षापासून मोठा वाघोदा बुद्रुक येथील ग्राम पंचायत मार्फत जि प शाळेसाठी तरतुदीनुसार १५ व्या वित्त आयोगातून निधी जिल्हा परिषद उर्दु शाळेच्या संदर्भात ग्राम पंचायतीने दूजाभाव न करता आराखड्यात शाळेला मूलभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन १५ वा वित्त आयोगाच्या आराखड्यात निधीची तरतूद करावी शाळा तसेच शाळेच्या आजुबाजुला परिसरातील घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही! याप्रकरणी लवकरच अल्पसंख्याक समाज बांधव जळगांव जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी सीईओ यांची  भेट घेऊन लेखी तक्रार करणार असल्याचे समजते!

प्रतिक्रिया

१) वाघोदा बुद्रुक जिल्हा परिषद उर्दू शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. शैक्षणिक साहित्य, शाळेतील खेळाचे मैदान आणि मूलभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन १५ व्या वित्त आयोगांतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा. शाकीर मलिक, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.

२)जिल्हा परिषद उर्दू शाळेसाठी आवश्यक असलेल्या सुविधांबद्दल शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने मला माहिती दिली आहे आणि मागण्यांचे निवेदन देखील सादर केले आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत निधी विनियोग करून लवकरच व्यवस्था केली जाईल.  

श्री हरी तायडे 

ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत मोठा, वाघोदा, बुद्रुक, तालुका, रावेर.

No comments