adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक स्वीकार्यता असलेले विद्यार्थी घडवायचे असतील तर वैज्ञानिक दृष्टिकोन का महत्त्वाचा?

  जागतिक स्वीकार्यता असलेले विद्यार्थी घडवायचे असतील तर वैज्ञानिक दृष्टिकोन का महत्त्वाचा? आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाधिष्ठित...

 जागतिक स्वीकार्यता असलेले विद्यार्थी घडवायचे असतील तर वैज्ञानिक दृष्टिकोन का महत्त्वाचा?

आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाधिष्ठित समाजाचे युग आहे. माहितीच्या जागतिक देवाणघेवाणीमुळे प्रत्येक राष्ट्रातील विद्यार्थी जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले जात आहेत. अशा परिस्थितीत भारतातील विद्यार्थ्यांना जगाच्या पातळीवर मान्यता मिळवून द्यायची असेल, तर त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे अत्यंत आवश्यक ठरते.

वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा, गैरसमज व ऐकीव गोष्टींपासून दूर ठेवतो. "का?" आणि "कसे?" या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वृत्ती त्यांच्यात विकसित होते. त्यामुळे ते विवेकाने विचार करून योग्य निर्णय घेऊ शकतात.

आजच्या स्पर्धात्मक जगात नावीन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञान यांनाच प्राधान्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना समस्यांकडे केवळ अडथळा म्हणून न पाहता, त्या सोडविण्याची संधी म्हणून पाहायला शिकवतो. यामुळे ते संशोधन, स्टार्टअप्स आणि नवकल्पनांत आघाडीवर राहतात.

वैज्ञानिक  दृष्टिकोन असलेले विद्यार्थी उदारमतवादी, सहिष्णु आणि खुले विचारसरणीचे बनतात. विविध संस्कृती, भाषा व मतांना समजून घेण्याची तयारी त्यांच्यात निर्माण होते. हे गुण जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांना तथ्य, पुरावे आणि डेटा यांवर आधारित निर्णय घेण्याचे प्रशिक्षण देते. त्यामुळे जीवनातील किंवा समाजातील गुंतागुंतीच्या समस्यांवर ते योग्य उपाय शोधू शकतात. विज्ञान हे सतत प्रश्न विचारण्याची, शोध घेण्याची आणि नवे ज्ञान आत्मसात करण्याची प्रेरणा देते. ही शिकण्याची वृत्ती जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनिवार्य आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ अभ्यासक्रमातील विषय नसून जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविण्याचा पाया आहे. तर्कशुद्धता, नवोन्मेष, सहिष्णुता आणि समस्या सोडविण्याची क्षमता या सर्व गोष्टींची जडणघडण वैज्ञानिक दृष्टिकोनातून होते. म्हणूनच जागतिक स्वीकार्यता असलेले विद्यार्थी घडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हा अनिवार्य घटक ठरतो. सत्य स्वीकारा. एक शिक्षक म्हणून, परिवर्तन गरजेचे आहे. जागे व्हा. अन्यथा पिढ्या न पिढ्या उध्वस्त होतील.


विज्ञान शिक्षक: 

आयु. सचिन भिमराव लोखंडे.

No comments