adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुचेता सैंदाणे यांना SET परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात यश

 सुचेता सैंदाणे यांना SET परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात यश   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जि. प. प्राथमिक शाळा अनवर्दे बुधगा...

 सुचेता सैंदाणे यांना SET परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात यश  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जि. प. प्राथमिक शाळा अनवर्दे बुधगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील कार्यरत प्राथमिक शिक्षिका श्रीम. सुचेता रामदास सैंदाणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या SET परीक्षेत शिक्षणशास्त्र (Education) विषयात यश संपादन केले आहे.

नोकरी व घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत सातत्याने अभ्यास करण्याची त्यांची जिद्द आणि शिक्षणाची आवड या यशामागे ठळकपणे दिसून येते. यापूर्वीही त्यांनी इंग्रजी या विषयात SET परीक्षा उत्तीर्ण होऊन आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली होती. मूळच्या भाटपुरा गावच्या असलेल्या सुचेता सैंदाणे या अंगणवाडी सेविका श्रीम. कल्पनाबाई सनेर यांच्या सून व प्राथमिक शिक्षक श्री. जितेंद्र सनेर यांच्या पत्नी आहेत त्यांच्या या दुहेरी यशामुळे कुटुंबासह तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुचेता सैंदाणे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments