adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नवरात्र उत्सव साजरा करताय तर प्रशासनाच्या नियमांचे पालन करा...अन्यथा कारवाई करणार : सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिला संदेश..!!

 नवरात्र उत्सव साजरा करताय तर प्रशासनाच्या नियमांचे पालन करा...अन्यथा कारवाई करणार : सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिला संदेश..!...

 नवरात्र उत्सव साजरा करताय तर प्रशासनाच्या नियमांचे पालन करा...अन्यथा कारवाई करणार : सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिला संदेश..!!  



सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 गणेश उत्सवानंतर आता नवरात्री उत्सव सुरू होणार असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. नारायणगांव पोलीस ठाणेच्या हद्दीमधील नवरात्र उत्सव मंडळाच्या बैठकीमध्ये नवरात्र उत्सव साजरा करताना पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करा म्हणजे डीजे, लेझर बीम लाईट चा वापर टाळा आणि शांतता राखणे आवश्यक आहे. उत्सव मंडळांनी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेवुन उत्सव शांततेत साजरा करावा. उत्सवात कोणताही व्यक्तीने कायदा हातात घेतल्यास किंवा पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करणार आहात नारायणगांव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी  प्रसारमाध्यमांतून आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. बऱ्याचदां  पोलीस प्रशासन सणासुदीच्या काळात अशी आव्हानं करतात जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सण उत्सव शांततामय, सुरक्षितपणे पार पडावा. तसेच मिरवणुकी दरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हानं देखील करण्यात आले आहे. आपल्या पोलिस ठाणेच्या हद्दीमध्ये गणेशोत्सव उत्सव देखील शांततापूर्वक आणि आनंदात साजरा झाला. नवरात्र उत्सव हा पारंपारिक पद्धतीत तसेच शांतता व सुव्यवस्था सण शांततामय आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यावर भर द्यावा : असे आव्हानं नारायणगांव पोलीस ठाणेचे स.पो.नि. महादेव शेलार यांनी  पोलीस ठाणेच्या हद्दीमधील नवरात्र उत्सवांच्या मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांना केले आहे.

No comments