adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोरेगांवला पुन्हा एकदा महिला पोलीस उपअधिक्षक : राजश्री तेरणी-पाटील यांची नियुक्ती.. कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवणार दिली ग्वाही..!!

 कोरेगांवला पुन्हा एकदा महिला पोलीस उपअधिक्षक : राजश्री तेरणी-पाटील यांची नियुक्ती.. कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवणार दिली ग्वाही..!!   सौ. क...

 कोरेगांवला पुन्हा एकदा महिला पोलीस उपअधिक्षक : राजश्री तेरणी-पाटील यांची नियुक्ती.. कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवणार दिली ग्वाही..!!  


सौ. कलावती गवळी  (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 राज्य गृह विभागांचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी सायंकाळी (डीवाय एसपी ) दर्जेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये काही अधिकार्‍यांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये कोरेगांव तालुक्यांचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी गेल्या महिन्यांत कोरेगांव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला होता. अजित टिके यांची प्रमोशनने नागपूर ला बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून राजश्री तेरणी-पाटील यांची नियुक्ती झाली असून. राजश्री तेरणी-पाटील यांची प्रथमच सातारा जिल्हा पोलीस दलात नव्याने येत आहेत. त्या कोरेगांव ग्रामीण ला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लवकरच रुजू होणार आहेत. राजश्री तेरणी-पाटील या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यांतील हिंटणी च्या असुन सर्व सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. राजश्री तेरणी-पाटील यांना कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जाते. कोरेगांव उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून या तिसऱ्यांदा महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्यांच्या  नियुक्ती बद्दल संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या वतीने संपर्कांच्या माध्यमांतून त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राजश्री तेरणी-पाटील मॅडम लवकरच कोरेगांव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

No comments