पालक सभा ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना एकत्र आणणारी गगनभेद बहुउद्देशीय संस्था संचलित सनराइज किड्स स्कूल अडावद. येथे पालक सभेचे आयोजन...
पालक सभा ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना एकत्र आणणारी
गगनभेद बहुउद्देशीय संस्था संचलित सनराइज किड्स स्कूल अडावद. येथे पालक सभेचे आयोजन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गगनभेद बहुउद्देशीय संस्था संचलित सनराइज किड्स स्कूल अडावद. येथे 13 सप्टेंबर शनिवार रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली. पालक सभा ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना एकत्र आणणारी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जी मुलांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. या सभेमुळे पालक आणि शिक्षकांमध्ये खुला संवाद साधला जातो. त्यामुळे मुलांच्या प्रगतीचा आढावा घेणे, त्यांच्या समस्यावर चर्चा करणे आणि घरी मुलांच्या अभ्यासाला मदत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखता येतात.
महाराष्ट्र राज्यात 1996 मध्ये PTA (पालक - शिक्षक संघटना) अनिवार्य करण्यात आले होते. जेणेकरून मुलांच्या शिक्षणामध्ये पालक आणि शाळा यांच्यात एक मजबूत भागीदारी निर्माण होईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरी, उपस्थिती आणि वर्तनाबद्दल शिक्षक पालकांना माहिती देतात. ज्यामुळे पालकांना यांच्या मुलांच्या प्रगतीची कल्पना येते. पालक आणि शिक्षक यांच्यात एक चांगला संवाद निर्माण होतो. यामुळे मुलांच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करता येते. असे मार्गदर्शन आ शाम महाजन सर यांनी केले.
पालकांनी आपल्या समस्या देखील सांगितल्या, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी पालकांच्या समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पालकांच्या समस्येच निराकरण केले. सभेनंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या PT - 1 Exam, Monthly Test, Report Card हे देखील दाखविले. ज्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मिळण्यास मदत झाली.अशी माहिती मुख्याध्यापक सौ पूनम बोरसे मॅडम यांनी पालकांना दिली.आजच्या सभेला पालक प्रतिनिधी म्हणून म्हणून श्री शिवम सोनवणे हे लाभले होते. यांनी देखील विद्यार्थ्यांबद्दल व शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त केले.तसेच हर्षदा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांबद्दल माहिती अश्विनी चौधरी यांनी दिली. व आभार मोनाली पाटील मॅडम यांनी व्यक्त केले.

No comments