adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कत्तलीसाठी आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांना स्थानिक गुन्हे शाखेकडून जीवदान..३३ लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपी अटकेत

  कत्तलीसाठी आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांना स्थानिक गुन्हे शाखेकडून जीवदान..३३ लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपी अटकेत   सचिन मोकळं अहिल्यानगर (सं...

 कत्तलीसाठी आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांना स्थानिक गुन्हे शाखेकडून जीवदान..३३ लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपी अटकेत  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१३):-नेवासा तालुक्यातील घोडेगांव येथुन कत्तलीसाठी आणलेल्या 26 गोवंशीय जनावरांची सुटका करत 05 आरोपींकडुन 33,00,000/-लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत सोनई पोलीस स्टेशन हद्दीत घोडेगावचे शिवारातील शेख वस्ती या ठिकाणी फिरोज शेख हा त्याचे साथीदाराचे मदतीने महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरे कत्तल करण्यास मनाई असतांना त्याने काही जनावरे कत्तल करण्याचे उददेशाने आणुन विना चारा पाण्यावाचुन डांबुन ठेवले असुन सदर जनावरे ट्रकमध्ये भरुन कत्तल करण्यासाठी घेवुन जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली.सदर माहितीचे अनुषंगाने पोनि श्री.कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र तीन पथके तयार करुन सदर पथकासह घोडेगांव ते सोनई जाणारे रोडलगत,शेख वस्ती या ठिकाणी जावुन खात्री केली काही इसम एका ट्रकमध्ये गोवंशीय जनावरे भरतांना दिसुन आले.पथक सदर इसमांकडे जात असतांना जनावरे भरणारे इसम पोलीस पथकास पाहुन पळुन जावु लागले.सदर इसमांचा पाठलाग करुन त्यातील 03 इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे फिरोज रशिद शेख वय 36 वर्षे,रा.घोडेगाव ता. नेवासा.जि.अहिल्यानगर,लाला ऊर्फ अफताब हरुन शेख वय 28 वर्ष रा.सदर,शुभम बाबासाहेब पुंड वय 25 वर्ष रा.माळी चिंचोरा,ता.नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.त्यांचेकडुन पळुन गेलेल्या इसमांबाबत विचारपुस केली असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमांची नावे भारत भाऊसाहेब शहाराव,रा.फत्तेपुर ता.नेवासा जि.अहिल्यानगर, (फरार),जुनेद शेख (पुर्ण नाव माहित नाही) रा.मुंगी ता. शेवगाव (फरार) असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे कब्जामध्ये 13,00,000/- रुपये किमतीचे 26 जिवंत गोवंशीय जनावरे, 20,00,000/- रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा एम. एच. 11 सी. एच. 8599 या क्रमांकाचा ट्रक असा एकुण 33,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन मिळुन आलेल्या इसमांविरुध्द सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 350/2025 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे  कलम 5 (अ)(ब) 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणे कलम 3 व 11  प्रमाणे पोना/437 सोमनाथ आसमानराव झांबरे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये,पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे,ऱ्हदय घोडके, लक्ष्मण खोकले,गणेश लोंढे, संतोष खैरे,सुयोग सुपेकर, सोमनाथ झांबरे,शामसुंदर जाधव,भिमराज खर्से, भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,जालिंदर माने,प्रमोद जाधव,उमाकांत गावडे,अरुण मोरे,सारिका दरेकर,सुवर्णा गोडसे शाखेचे यांनी केलेली आहे.

No comments