adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव येथील सोनल पाटील व पारोळा शेवगे बुद्रुक येथील महेश पाटील शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

  धरणगाव येथील सोनल पाटील व पारोळा शेवगे बुद्रुक येथील महेश पाटील शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित   विकास पाटील धरणगाव (संपा...

 धरणगाव येथील सोनल पाटील व पारोळा शेवगे बुद्रुक येथील महेश पाटील शहीद वीर भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित  


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : येथील अदिती ब्युटी पार्लर अँड अकॅडमीच्या संचालिका तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जळगाव महिला जिल्हाध्यक्षा सोनल पाटील व  पारोळा तालुक्यातील शेवगे येथील महेश पाटील यांना नुकताच वीर शहीद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अधिवेशनात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा ), माजी  क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय दादा बनसोडे,

लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड, सीआरपीएफ असिस्टंट कमांडर विशालजी कोरे, राणी ताई स्वामी, अनिल दादा देसले, उल्हास दादा पाटील, राष्ट्रीय पदाधिकारी व राज्य पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला. 

गोर, गरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी पाटील यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने करून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. त्यांचे हे कौतुकास्पद सामाजिक कार्य पाहून त्यांना संघटनेचे

 राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते वीर शहीद भगतसिंग या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष प्रदीप बाबांच्या मार्गदर्शनाखाली ते आजही महिलांना, व पुरुषांना आत्मनिर्भर करत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. त्याची या कार्याची  दखल घेत आ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने त्यांना हा बहुमान दिला आहे. सोनल पाटील व महेश पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व मित्र परिवार, गुरुजन, व आतपेष्ट यांच्या कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

No comments