adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

*त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा दैनिक बाळकडू चे संपादक व पत्रकार टीम कडून निषेध..* चोपडा : (प्रतिनिधी ) : त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या निषेधार्थ दैनिक बाळकडू चे संपादक दीपक खरात व दैनिक बाळकडू चे सर्व पत्रकार टीम कडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सर्वांनी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. पत्रकारांवरील हल्लाची घटना त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंग परिसरात घडली. ‘झी २४ तास’ चे ब्युरो चीफ योगेश खरे, ‘साम टीव्ही’ चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि ‘पुढारी न्यूज’ चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर पार्किंग कर्मचाऱ्यांनी लाथा-बुक्क्यांनी व दगड फेक करून हल्ला केला. दैनिक बाळकडू टीमने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करताना म्हटले आहे की, पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असून ते अतिशय निंदनीय आहे. समाजहितासाठी आणि सत्यासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांवर होणारे हल्ले कदापीही सहन केले जाणार नाहीत. असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच प्रशासनाने दोषिंवर तातडीने कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारीही घ्यावी अशी मागणी करण्यात आली.

 त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा दैनिक बाळकडू चे संपादक व पत्रकार टीम कडून निषेध..   चोपडा  (प्रतिनिधी ) :  (संपादक -:- हेमकांत ...

 त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा दैनिक बाळकडू चे संपादक व पत्रकार टीम कडून निषेध.. 



 चोपडा  (प्रतिनिधी ) : 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या निषेधार्थ दैनिक बाळकडू चे संपादक दीपक खरात व  दैनिक बाळकडू चे सर्व पत्रकार टीम कडून निषेध  व्यक्त करण्यात आला. यावेळी सर्वांनी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 

      पत्रकारांवरील हल्लाची घटना त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंग परिसरात घडली. ‘झी २४ तास’ चे ब्युरो चीफ योगेश खरे, ‘साम टीव्ही’ चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि ‘पुढारी न्यूज’ चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर पार्किंग कर्मचाऱ्यांनी लाथा-बुक्क्यांनी व दगड फेक करून हल्ला केला. 

  दैनिक बाळकडू टीमने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करताना म्हटले आहे की, पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असून ते अतिशय निंदनीय आहे. समाजहितासाठी आणि सत्यासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांवर होणारे हल्ले कदापीही सहन केले जाणार नाहीत. असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच प्रशासनाने दोषिंवर तातडीने कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नयेत याची खबरदारीही घ्यावी अशी मागणी करण्यात आली.

No comments