adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दलित समाजातील कुंदन नरेश चावरिया रा. लासलगाव जि. नाशिक याची निघृण हत्या केल्या बाबत आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी तहसीलदारांना निवेदन सादर

 दलित समाजातील कुंदन नरेश चावरिया रा. लासलगाव जि. नाशिक याची निघृण हत्या केल्या बाबत आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी तहसीलदारांना निवेदन सादर  ...

 दलित समाजातील कुंदन नरेश चावरिया रा. लासलगाव जि. नाशिक याची निघृण हत्या केल्या बाबत आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी तहसीलदारांना निवेदन सादर 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : लासलगाव जि. नाशिक येथील दलित समाजाचा कुंदन नरेश चावरिया १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समाजकंटकांनी निघृण, अमानुषपणे खून केला आहे. तरी शासनाने सदर खटला/प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. जेणेकरून कोणत्याही एस. सी., एस. टी. व अल्पसंख्याक समाजावर असा अन्याय करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही.

एस सी, एसटी अल्पसंख्याक समाजातर्फे आज धरणगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांना समाजातर्फे लेखी निवेदन देण्यात आले व आरोपींवर कडक कारवाई होऊन फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली निवेदन देताना धरणगाव येथील एकनाथ (पापा) वाघरे, युवराज रायपूरकर ,दीपक वाघमारे, अविनाश बाविस्कर, विनय बिवाल, रमेश वैद्र, दीपक बिवाल, शुभम पचरवाल, शेख अहमद, दानिश मोमीन, हिसामोद्दीन मोमीन, चेतन (महाराज) वाघरे आदी समाज बांधव उपस्थित होते तरी महोदयांनी सदर निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.

No comments