adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विरोदा येथे महसूल विभागाची धडक कारवाई बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

 विरोदा येथे महसूल विभागाची धडक कारवाई  बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त   इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वि...

 विरोदा येथे महसूल विभागाची धडक कारवाई 

बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त  


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विरोदा ता यावल मौजे विरोदे परिसरात बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने प्रभावी कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केले. आज दिनांक ११/९/२०२५ रोजी बामणोद मंडळ अधिकारी . दिपक गवई यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी बामणोद . विजय शिरसाठ, फैजपूर श्रीकांत केंद्रे, कोसगाव  दिलीप केदारे, दुसखेडा श्रीमती सुचिता देशभरातर, डोंगर कठोरा  गजानन पाटील, सांगवी  गोरटे आप्पा, मोहराळे  संजय तडवी व कोतवाल प्रशांत सरोदे यांनी संयुक्त तपासणी मोहीम राबवली.या मोहिमेदरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. सी २६८८ हे परवानगीशिवाय गौण खनिज (मुरूम/वाळू) वाहतूक करताना आढळून आले. सदर ट्रॅक्टरचा मालक सुरेश जगन्नाथ सोनवणे, रा. पिंपरूड यांच्याविरुद्ध महसूल विभागाने नियमांनुसार कारवाई केली. जप्त केलेले ट्रॅक्टर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी फैजपूर पोलीस स्टेशन येथे सदर ट्रॅक्टर लावण्यात आले.ही मोहीम बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व वाहतूक थांबवण्यासाठी महसूल विभागाची तत्परता दर्शवते. गावकऱ्यांनी महसूल पथकाच्या या वेळेवर कारवाईचे स्वागत केले असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाहतुकीवर आळा घालण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यात पी एस आय राशीत तडवी. पो. कॉ. ज्ञानेश्वर चौधरी. स. फौ. अरुण नमायते.पो. कॉ. जीवन तायडे. रुपेश पाटील . यांच्या सहकार्य लाभले

No comments