महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे बनवून विनयभंगः आरोपीस अटक ! मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यात...
महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे बनवून विनयभंगः आरोपीस अटक !
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन ला महिलेच्या नावाने खोटे इन्स्टाग्राम खाते तयार करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप असल्याचे दाखल गुन्हा (रजि. क्रमांक 227/2025) अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 75(3), 296 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67, 67 (अ) यांच्याशी संबंधित प्रकरणात एका 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने महिलेच्या नावाने खोटे इन्स्टाग्राम खाते तयार करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी आशिष अडसूळ (पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन), सपोनि विशाल पाटील (सावदा पोलीस स्टेशन) आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे आरोपी शुध्दोधन मोहन सिरसाठ (वय 26, रा. न्यू भिमनगर, शिवणी, ता. जि. अकोला) याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान, आरोपीने फिर्यादीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून तिची बदनामी केल्याचे उघड झाले आहे.
सदर आरोपीला 11 सप्टेंबर 2025 रोजी रावेर न्यायालयात हजर केले असता, त्याला 13 सप्टेंबर 2025 पर्यंत न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडीत सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू
असून सायबर गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिला आहे
सोशल नेटवर्किंग मिडीयाचा साइटवर जपून व जागरूक होऊन हाताळायला हवं सोशल मीडिया वर कोणी बदनामी अगर विनयभंग करीत असेल तर तातडीने पोलीसांशी संपर्क साधावा व जो कोणीही सोशल मीडिया द्वारे गुन्हा करेल त्यांचेवर कठोर कारवाई चा बडगा उगारला जाणार असल्याचे ही सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले
No comments