फैजपुर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थ्यांना परवानगी पत्र वाटप इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नगरपरिषद अंतर्गत अ...
फैजपुर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थ्यांना परवानगी पत्र वाटप
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नगरपरिषद अंतर्गत अंगीकार अभियान 2025 आणि सेवा पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते सदर कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना 1.0 अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांच्या घराचे काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी सुपूर्त करून त्यांच्या स्वतःच्या घर पूर्ण होण्याच्या नगरपालिका सहभागी झाली आणि प्रसंग आली तसेच प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना घराचे बांधकाम सुरू करण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी मुख्याधिकारी फैजपूर नगरपरिषदे यांचे मार्गदर्शनाखाली बांधकाम परवाना वितरित करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी नगरपरिषद फैजपूर मुख्याधिकारी अविनाश गांगोडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाला फैजपूर नगरपरिषदेचे कर निरीक्षक तथा कार्यालय निरीक्षक श्री हेमंत ठाकरे आस्थापना अधिकारी सचिन चौधरी संगणक अभियंता राहुल शेंडगे नुलम विभागाचे प्रमुख प्रवीण सपकाळे नरेंद्र बाऊस्कर आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नियुक्त सीएलटीसी जगदीश महाजन उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने फैजपूर नगरपरिषदेचे सीएलटीसी जगदीश महाजन यांनी लाभार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत त्यांचे मित्रमंडळी, शेजारी यांना सदर योजनेबाबत माहिती देणे व सदर योजनेच्या लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विनंती केली तसेच लाभार्थ्यांमार्फत योजनेत योजनेची जनजागृती कशा प्रकारे करता येईल व जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ देता येईल पीएम स्वनिधी अंतर्गत पंधरवाडा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पीएम स्वनिधीचा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्याबाबत व योजनेचा प्रचार प्रसार करणे बाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले

No comments