प्रवीण वारके यांना जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहीर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - न्हावीयेथील शारदा माध्यमिक विद्यालयाती...
प्रवीण वारके यांना जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहीर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- न्हावीयेथील शारदा माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक प्रवीण मधुकर वारके यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्याकडून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक ,प्रशासकीय व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय केलेले कार्य लक्षात घेता त्यांना संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आला आहे. तशा आशयाचे पत्र त्यांना नुकतेच संस्थेच्या अध्यक्षा सौ संदीपा वाघ यांच्याकडून प्राप्त झाले आहे. २८ सप्टेंबर रोजी त्यांना हा पुरस्कार जळगाव येथील अल्पबचत भवन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments