adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चळवळीचा आवाज दाबण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर हल्ला... सभापती राम शिंदे व आमदार सुरेश धस यांनी आरोपींना पाठबळ न देता साळवे यांच्या बाजूने उभे राहावे-अँड विवेक चव्हाण...

  चळवळीचा आवाज दाबण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर हल्ला...  सभापती राम शिंदे व ...

 चळवळीचा आवाज दाबण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर हल्ला...

 सभापती राम शिंदे व आमदार सुरेश धस यांनी आरोपींना पाठबळ न देता साळवे यांच्या बाजूने उभे राहावे-अँड विवेक चव्हाण...

आरोपींना अटक व कुटुंबाला संरक्षण द्यावे अन्यथा 30 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलनाची घोषणा  


सचिन मोकळं अहिल्यानगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

अहिल्यानगर (दि.१२)- रिपब्लिकन चळवळीचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन नेते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच साळवे यांच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी ठाम मागणी भारतीय दलित कोब्रा संघटनेचे प्रमुख अँड. विवेक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात 30 सप्टेंबर रोजी जामखेड येथे जिल्हा व राज्यातील दलित बांधवांच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. विवेक चव्हाण म्हणाले की, "साळवे यांनी नेहमीच दलितांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. जामखेडमध्ये एका महिलेच्या संदर्भातील घटनेवर त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर गुंड प्रवृत्तीच्या काही समाजातील आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या हल्ल्यात त्यांच्या पाच नातेवाईकांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या मुलाचा डोळा जखमी झाला असून, पत्नीच्या हातावर खोल जखमा झाल्या आहेत. सध्या सर्वांवर उपचार सुरू  आहे." चव्हाण यांनी पुढे सांगितले की, "हा हल्ला केवळ साळवे यांच्यावर नसून दलित चळवळीवर केलेला हल्ला आहे. आरोपींपैकी काहींना पोलिसांनी पकडले असले तरी अजून मोकाट आहेत. त्यांना तात्काळ अटक करावी. पोलिसांनी गंभीर कलमे न लावता सौम्य गुन्ह्याखाली त्यांना अटक केली आहे, ही बाब धक्कादायक आहे. 120 (ब)सारखी कडक कलमे आणि मोका अंतर्गत गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे."

यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाला इशारा देत सांगितले की, "आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व रिपब्लिकन व दलित बांधव या आंदोलनात सहभागी होतील." दरम्यान, या प्रकरणी विधानसभेचे सभापती राम शिंदे आणि माजी मंत्री सुरेश धस यांनीही लक्ष घालावे व सामाजिक न्यायाची बूज राखण्यासाठी साळवे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही विवेक चव्हाण यांनी केले.

पुढे बोलताना सुरेश बनसोडे म्हणाले की, दलित नेत्यावर अशा पद्धतीने हल्ला होणे हे एक प्रकारे गंभीर बाब आहे. वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना पाठीशी घालू नये तसेच जे गुन्हेगार पकडले आहेत त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करावी अन्यथा केव्हाही अहिल्यानगर शहर देखील बंद पुकारले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी भारतीय दलित कोब्रा प्रमुख अँड विवेक चव्हाण, ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड, युवा नेते सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, लॉरेन्स स्वामी, अविनाश भोसले, सिद्धार्थ आढाव, अंकुश मोहिते, पप्पू पाटील, समीर भिंगारदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते

No comments