adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर सर्व शेतकरी बंधूंनी ई पीक पाहणी लवकरात लवकर करावी -:- तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे आव्हान

 ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर सर्व शेतकरी बंधूंनी ई पीक पाहणी लवकरात लवकर करावी -:- तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे आव्हान ई...

 ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर

सर्व शेतकरी बंधूंनी ई पीक पाहणी लवकरात लवकर करावी -:- तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे आव्हान

ई पीक नोंदणी केली नसेल तर  हमीभावाने माल विक्री करता येणार नाही 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : संपूर्ण राज्यभर ईपीक पाहणी डीसीएस अँप द्वारे शेतकऱ्यांकडून केली जात आहे आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांकडून अजून इ पीक पाहणी झालेली नाही. 15 सप्टेंबर ही अंतिम मुदत इ पिक पाहणी करण्याची आहे. हंगाम 2025 26 साठी लवकरच शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शेतमालाची तेलबिया व कडधान्य पिकाची खरेदी ही केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे व त्यासाठी ई पीक पाहणी केलेले शेतकरीच पात्र ठरतील त्यामुळे ई पीक पाहणी करणे खूपच महत्त्वाचे आहे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीत माल विकता येणार नाही.  ई पिक पाहणी मुळे शासनाला समजते की शेतकऱ्यांनी कुठल्या पिकाची लागवड शेतात केलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकाची नोंद शासनाकडे ही होत असते त्यामुळे खरेदी केंद्रावर होणारा गैरव्यवरांना सुद्धा आढा बसतो व पात्र शेतकरीच या योजनेत समाविष्ट असतात. थोडक्यात ई पिक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कोणते पिकाची लागवड केलेली आहे याची माहिती  ई पीक पाहणीच्या माध्यमातून शासनाकडे नोंदवली जाते. ई पिक पाहणी केली नसेल तर शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार, कुठल्याही प्रकारची शेतमालाचे नुकसान भरपाई मिळणार नाही, नाही कुठल्याही प्रकारची शेतमालाचे अनुदान मिळणार नाही, बँकेचे कर्ज मिळणार नाही, शेत माल  हमीभावाने  विक्री करता येणार नाही, असे एक नाही तर अनेक अडचणींना शेतकऱ्यांना समोर जावे लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या तीन दिवसात आपली ई पीक पाहणी डीसीएस (DCS) पोर्टलचे ऍप द्वारे नोंदणी करून घ्यावी असे आवाहन धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.

No comments