शिरागड येथे सोमवारी निवासिनी सप्तशृंगी देवीच्या मंदिरात घट पुजनाचे आयोजन दहा दिवस चालणार विविध धार्मिक कार्यक्रम भरत कोळी यावल ता.प्रतिन...
शिरागड येथे सोमवारी निवासिनी सप्तशृंगी देवीच्या मंदिरात घट पुजनाचे आयोजन
दहा दिवस चालणार विविध धार्मिक कार्यक्रम
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- तालुक्यातील शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या याञेला सोमवार पासुन सूरुवात होणार आहे.
२२ सप्टेंबर रोजी बांभोरी येथील रामचंद्र नन्नवरे व कमलबाई नन्नवरे यांचा शुभहस्ते सकाळी ८ वाजता घट पुजन करण्यात येईल तर २३ तारखे पासून दररोज कीर्तन ,भारुड ,वही गायन,हवन, पुजा.पाठ सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे
कोळन्हावी व शिरागड दोन्ही गावाच्या तापीनदीच्या उंच टेकडीवर श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे हे दैवत "लहान गड म्हृणून ओळखले जाते भावीकांची मनोकामना पुर्ण होऊन सुख समृद्धीची देन देणारे हे दैवत आहे.
जळगाव जिल्ह्यात श्री सप्तशृंगी देवीचे लहान गड म्हणून अख्यायिका अशी आहे की शिरागड येथे दाट अरण्य होते. तापी नदीच्या काठवर शांत मनमोलक वातावरण उंच टेकड्या व दर्याखोय्रार असलेल्याने येथे रुर्षि मुनीचे वास्तव्य होते येथे जगाच्या हितासाठी व कल्याणासाठी जप तप होम हवन पुजा पाठ रूर्षिमुणी करीत होते याची वार्ता राक्षस दैत्यासुराला कळाली असता त्याने येथे आहाकार माजला रुर्षिमुनीनी देवीची आराधना केली असतां श्री सप्तशृंगी देवी येथे प्रगत झाली व दैत्यासुराशी तिने युध्द केले.
दैत्यासुर जीव वाचविण्यासाठी सैरावैर पळ काढला व सप्तशृंगी देवीने वायुवेगाने त्याच्या पाठलाग करुण पहाड पोखरुण नाशिक येथील गडावर वणी येथे या दैत्यासुराचा वध केला.याठीकाणी तिने विश्रांती घेतल्याने नाशिक येथील वणीचे गड म्हणून उदयास आले कोळन्हावी व शिरागड या दोन्ही गावाच्या मध्यभागी तापी नदीच्या कीणारी सप्तश्रुगीमाता देवी विराजमान झाली.तेव्हापासून मोठा गड नाशिक येथील वणीचे गड व शिरागडला लहान गड म्हृणून ओळखले जाते.भावीकांचे श्रध्दास्थान म्हणून भाविक बाराही महीने देवीच्या दर्शनासाठी येतात
श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भावीक येतात.
श्री निवासीनी सप्तश्रृगी देवी विस्तव मंडळाचे अध्यक्ष योगराज सोळके , सचिव प्रताप सोनवणे ,पोपा सुधाकर सोळके हिम्मत सोळक सरपंच योगिता सोनवणे सह शिरागड येथील तरुण मंडळी भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सहकार्य करतात.
दर्शनासाठी रस्त्याची सोय
तापी नदीला पाणी .असल्याने कोळन्हावी येथून जाणाऱ्या भावीकांना होळीच्या साह्याने श्री सप्तश्रुगी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाता येणार आहे तर साकळी-मनवेल मार्गे शिरागड बस यावल आगारातून उपलब्ध आहे

No comments