ग्राम घुस्सर येथील नागरिकांचा मागणीला यश शेवटी ग्राम घुस्सर येथे बस फेरी सुरु अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मोताळा:- ...
ग्राम घुस्सर येथील नागरिकांचा मागणीला यश शेवटी ग्राम घुस्सर येथे बस फेरी सुरु
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोताळा:- ग्राम.घुस्सर येथील ग्रामपंचायत व सर्व गावकऱ्यांच्या वतीने दि.१९ ऑगस्ट ला मलकापूर बस स्थानक चे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले होते.
निवेदनात असे नुमुद केले होते की , घुस्सर येथील मोठ्या प्रमाणात विध्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी दाताला,मलकापूर ला जात असता व बाजार पेठ मलकापूर ला असल्यामुळं नागरिकांना पण मलकापूर ला यावं जावं लागत घुस्सर गाव हे मलकपूर बुलडाणा रोड पासून १ किमी आत आहे. त्यामुळं विद्याथ्यांना व नागरिकाना फाट्यावर १ किमी पायी येऊन सुद्धा बस वेळेवर मिळत नव्हती त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायला वेळ होत होता. विद्यार्थ्यांचे शिक्षणात खूप मोठे नुकसान होत होते व नागरिकांना पण त्रास होत होता.
परंतु आज ग्राम.घुस्सर येथील नागरिकांचा मांगणीला यश मिळाले. शेवटी आज दी.२१ सप्टेंबर ला संध्याकाळी ५:०० वाजता बस गावामध्ये आली व ग्राम घुस्सर चे प्रथम नागरिक सरपंच मा.श्री.भागवत भाऊ मुके व सर्व गावाकऱ्यांच्या वतीने बस ची पुजा करून बस चे चालक व वाहक यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्च देऊन स्वागत करण्यात आले.


No comments