फैजपूर शहरात दहा दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन क्रिकेट टूर्नामेंटच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा घडणार दर्शन इदू पिंजारी फैजपूर (संपा...
फैजपूर शहरात दहा दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
क्रिकेट टूर्नामेंटच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा घडणार दर्शन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर क्रिकेट टूरनामेंटच्या माध्यमातून तरुणांना एकत्रित आणून सामाजिक एकात्मता निर्माण व्हावी यासाठी भव्य अशा हिंदु मुस्लिम एकता चषकचे आयोजन फैजपूर येथे करण्यात आले आहे.ही क्रिकेट टूरनामेंट तीन टप्प्यात दहा दिवस क्रिकेट चे सामने रंगणार आहे.
या क्रिकेट टूरनामेंट आयोजन फैजपूर पालिकेचे कै.लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी क्रीडा संकुल येथे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटचा आठडा ते नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दहा दिवस करण्यात आले आहे.त्यात सर्व प्रथम फक्त फैजपूर शहरासाठी तीन दिवशीय हिंदु मुस्लिम एकता चषक क्रिकेट टूरनामेंट चे सामने होणार आहे.यात आठ संघ सहभागी होणार आहे. यासाठी २५ हजार रुपये व चषक बक्षिस देण्यात येणार आहे.यानंतर चार दिवशीय जळगांव जिल्हा मुस्लिम प्रीमियम लीग यात बारा संघ सहभागी होणार आहे.यासाठी ५०हजार रुपये व चषक बक्षिस देण्यात येणार आहे.यानंतर तीन दिवसीय ऑल इंडिया ओपन क्रिकेट टूरनामेंट होणार आहे.यासाठी १ लाख ११ हजार रुपये व चषक बक्षिस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत मुंबई,औरंगाबाद,नाशिक,पुणे,मालेगाव,धुळे,इंदोर (म.प्र), गुजरात येथील १६ संघ सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे दहा दिवस आयोजित या क्रिकेट टूरनामेंट "युट्युब लाईव्ह"दिसणार आहे.तसेच क्रिकेट टूरनामेंट पंच मुंबई,औरंगाबाद येथील असणार आहे.पंच मुंबई,औरंगाबाद येथील असणार आहे.भव्य अशा या क्रिकेट टूरनामेंटचे आयोजन फैजपूर येथील लिमरा फाउंडेशनचे अध्यक्ष शेख वसीम जनाब यांनी केले आहे.दरम्यान या क्रिकेट टूरनामेंटची तयारी सुरू आहे.यासाठी मोहसीन शेख,जाविद शेख,कैफखान,जफर अली,मुद्स्सर नजर,मोईन लेफ्टी,शेख वकार,गुड्डू शेख,रियाज शेख, अमिदउदजमा (अमो), अफसर शेख,अक्रम शेख ही परिश्रम घेत आहे. तरुणांना खेळाची आवड निर्माण व्हावी.तसेच क्रिकेट खेळाच्या माध्यमातून सर्व समाजातील तरुणांना एकत्रित आणून सामाजिक एकात्मता निर्माण व्हावी.विशेष म्हणजे
युवा तरुणांना नशा मुक्त व्हा व ऑनलाइन जुगार गेमिंग च्या माध्यमातून मुक्त व्हा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन शेख वसीम जनाब अध्यक्ष लिमरा फाउंडेशन यांनी केले आहे.

No comments