adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा तर्फे यशनिश्चय दिन उत्साहात साजरा

 मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा तर्फे यशनिश्चय दिन उत्साहात साजरा   विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) इंदिरा गांधी माध्यमिक विद्...

 मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा तर्फे यशनिश्चय दिन उत्साहात साजरा  


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथे मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा तर्फे यशनिश्चय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सी.के. पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे तसेच पर्यवेक्षक ए.एस. पाटील उपस्थित होते.

मनशक्ती केंद्राच्या मार्गदर्शक प्रा. उज्वला भिरुड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक विचारसरणी, ध्येय निश्चिती, आत्मशिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच मानसिक सशक्तता वाढविण्यासाठी ध्यान, श्वसन व एकाग्रतेच्या काही सोप्या पद्धती शिकवल्या. या कार्यक्रमाला इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक, मनशक्ती केंद्राचे कार्यकर्ते सरोज खांदे व डी.जी. भिरुड तसेच आदर्श माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन आरती जैन यांनी मानले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून जीवनात ध्येय निश्चिती व सकारात्मक विचार यांचे महत्त्व जाणून घेतले. यशासाठी आत्मविश्वास आणि नियमित प्रयत्न आवश्यक असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

No comments