चित्रकार सुनिल दाभाडे सर यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन केलं सन्मानित जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा पोलीस दल त...
चित्रकार सुनिल दाभाडे सर यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन केलं सन्मानित
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा पोलीस दल तर्फे गणेश उत्सव मिरवणूक व श्री गणेशा स्पर्धेचे परीक्षण उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी व आमदार मा.राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते चित्रकार सुनिल दाभाडे सर (कलाशिक्षक मानव सेवा विद्यालय जळगाव) यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी जळगाव चे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे साहेब जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी साहेब व मान्यवर उपस्थित होते.

No comments