सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी भुषण भालेराव ची जिल्हास्तरीय सुवर्ण कामगिरी भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- ...
सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी भुषण भालेराव ची जिल्हास्तरीय सुवर्ण कामगिरी
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल. दिनांक १६ सप्टेंबर रोजी शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती .यात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश म मिडिअम स्कूल मधील इ ७ वीचा विद्यार्थी भुषण रविंद्र भालेराव याने सहभाग नोंदविला होता . यात भूषण भालेराव या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळाले असून भुषण भालेराव या विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरावर निवड झाली आहे. यात विद्यार्थ्याचे कठोर परिश्रम, चिकाटी व क्रीडा शिक्षक सय्यद इरतेकाज सर यांचे मार्गदर्शन होते. या विजेत्या विद्याथ्याचे शाळेचे अध्यक्ष डॉ श्री प्रदीप माहेश्वरी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिला तायडे मॅडम यांनी कौतुक केले व क्रीडा शिक्षक सय्यद इरतेकाज सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

No comments