adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या गळ्यात हार,मंगळसूत्र घालून विविध ठिकाणी केला अत्याचार... तरुणावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!

 साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या गळ्यात हार,मंगळसूत्र घालून विविध ठिकाणी केला अत्याचार... तरुणावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!   संभाज...

 साताऱ्यात अल्पवयीन मुलीच्या गळ्यात हार,मंगळसूत्र घालून विविध ठिकाणी केला अत्याचार... तरुणावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!! 


 संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पुण्यात रिल्स करणाऱ्या महिलेकडे शरीर सुखाच्या मागणी तरी तू माझ्यासोबत एक रात्र झोप, या प्रकरणी एका तरुणावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर‌ सातारा मधूनही एक घटना समोर आली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या गळ्यात हार आणि मंगळसूत्र बांधून सातारा शहरांत तिला विविध ठिकाणी नेवुन तिच्यावर अत्याचार केला आहे. यात पीडित तरुणी नऊ महिन्यांची गरोदर राहिली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की माझ्या गळ्यात हार मंगळसूत्र घालून विवाह केला त्यानंतर त्याने मला सातारा शहरात विविध ठिकाणी नेवुन माझ्यावर अत्याचार केला यातून मी नऊ महिन्यांची गरोदर राहिली आहे. या प्रकरणा नंतर पोलिसांनी संबंधित तरुणावर अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर करीत आहेत.

No comments