भीम आर्मी भारत एकता मिशन कार्याला यश चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुका अध्यक्ष मुबारक भाऊ तडवी यांनी तडवी समाज बा...
भीम आर्मी भारत एकता मिशन कार्याला यश
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुका अध्यक्ष मुबारक भाऊ तडवी यांनी तडवी समाज बांधवांना येणाऱ्या अडचणी संदर्भात चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायत लोणी यांना इशारा दिला होता. अन्यायग्रस्त बांधवांनी आपली समस्या मांडण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात मुक्कामही केला होता.
या वेळी मुबारक तडवी यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, सात दिवसांत गटाराचे बांधकाम न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या इशाऱ्याची गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायत लोणी यांनी तात्काळ कारवाई केली व गटार बांधकाम पूर्ण केले.
या कार्यासाठी मुबारक भाऊ तडवी यांच्या वतीने तसेच अन्यायग्रस्त बांधवांच्या वतीने ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच, ग्रामसेवक साहेब यांचे आभार मानण्यात आले असून, भीम आर्मी भारत एकता मिशनच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. ✊

No comments