पुरीगोसावी कुटुंबातला (देव माणूस ) म्हणून तात्यांची ओळख... संभाजी पुरीगोसावी सातारकर..!! माधवी गिरी गोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. (स...
पुरीगोसावी कुटुंबातला (देव माणूस ) म्हणून तात्यांची ओळख... संभाजी पुरीगोसावी सातारकर..!!
माधवी गिरी गोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे आणि सध्या सातारा करंजे भैरवनाथ नगरीत वास्तव्यास असलेले कै: रामचंद्र बापूपुरी गोसावी उर्फ ( तात्या) यांचे मागील वर्षी ऐंन दिवाळीच्या सणात अचानक हृदयविकारांच्या धक्क्याने दुःखात निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण पुरीगोसावी कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांचा समाजातील जनसंपर्क आणि मार्गदर्शन लाभलेल्या नेहमीच सोबत असलेल्या सहकारी मित्रांना मित्रांना देखील अनेकांना देखील धक्का बसला होता. तात्यांचे संपूर्ण आयुष्य हे नि:स्वार्थ सेवेला आणि कायम माणसं जोडण्याला समर्पिंत होते. त्यांनी जागरण गोंधळाच्या माध्यमांतून तुळजाभवानी माता मांढरची काळुबाई आदीं देवींच्या धार्मिंक कार्यक्रमांतून सातारा कोल्हापूर मुंबई विदर्भ मराठवाडा इत्यादी ठिकाणी कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या सुसंस्कृत आणि समजूतदार नेतृत्वामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. तात्यांनी कुटुंबासाठी फक्त एक सदस्य नव्हे, तर एक आधारस्तंभ आणि मार्गदर्शक म्हणून कुटुंबात त्यांनी चांगलीच भूमिका बजावली होती. कुटुंबातील सर्वांनाच सांभाळून घेण्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले, आपल्या पत्नी मुले सुना नातवंडांसमवेत सातारा शहरांत करंजे ते वास्तव्यास होते.सन 1976 सालापासून साताऱ्यात तात्या वास्तव्यास होते. पण तात्यांना नेहमीच गावाकडची चांगलीच गोडी होती. न चुकता दर शनिवार रविवार किंवा आधी मधी आपल्या गावी येवुन जात होते. कुटुंबामध्ये सर्व निर्णयांमध्ये तात्यांचा अंतिम निर्णय मानला जात होता. आणि त्यांच्या एक वचनी नेतृत्वामुळेच कुटुंबात चांगलीच एकता शिस्त आणि सौहार्द टिकून राहिले होते. माझ्यासाठी ते केवळ काका नव्हे, तर वडिलांसारखेच होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मला कधीच वडिलांची उणीव भासू दिली नाही. त्यांचा आवाज मला आमचा संभाजी तर कधीकाळी गंमतीने साहेब म्हणून आवाज होता. तात्यांच्या जाण्यांने केवळ आमच्या पुरी गोसावी कुटुंबानेच नव्हे, तर समाजाने एक आपल्यातला ( देव माणूस ) गमावला आहे. पुरीगोसावी कुटुंबालाच नव्हे,तर आजही त्यांच्या आठवणीने अनेकांच्या डोळ्यात अश्रूं उभे राहतात. असा तात्यांचा सर्वांसोबत जीवन प्रवास चांगलाच राहिला होता. तात्यांची आठवण ही पुरी गोसावी कुटुंबात कायमच राहणार जड अंतःकरणाने आपल्या प्रतिक्रिया संभाजी पुरी गोसावी यांनी व्यक्त केल्या आहेत.

No comments