adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तालुक्यात बोगस पत्रकार वाढल्याने अधिकारी त्रस्त. खऱ्या पत्रकारांची कुचंबना,मिलिंद सोनवणे

 तालुक्यात बोगस पत्रकार वाढल्याने अधिकारी त्रस्त. खऱ्या पत्रकारांची कुचंबना,मिलिंद सोनवणे   चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चो...

 तालुक्यात बोगस पत्रकार वाढल्याने अधिकारी त्रस्त.

खऱ्या पत्रकारांची कुचंबना,मिलिंद सोनवणे  


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:--सद्ध्याचे युग हे सोशल मिडिया मुळे गाजतय किंवा लहान असो की मोठा जिकडे तिकडे सर्वांच्या हातात मोबाईल दिसतो.सर्वत्र यु ट्यूब चॅनेल खऱ्या खोट्या बातम्या काही विषय कटछाट करून दाखवणे,किंवा स्वतःचे पोर्टेल सुरू करून कोणाच्या ही बद्दल उलट सुलट बातम्या देण्याचे प्रकार जास्त बघायला मिळतात.मनासारखे न झाल्यास कोणालाही बदनाम करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचे धंदे राजरोस पणे सुरू असून अश्या प्रकारांमुळे सरकारी ऑफिस मधील कर्मचारी अधिकारी त्रस्त झाल्याचे दिसताय.

       खरे पत्रकार व मोठ्या वर्तमान पत्राचे पत्रकार कधीही कोणत्याही कार्यालयात विनाकारण फिरतांना दिसत नाहीत.पण आता सद्द्याच्या परिस्थितीत माहीती अधिकार टाकणारे,छोट्या मोठ्या घटनांचे विषय वाढवून अधिकारी वर्गाला घाबरवून आणि एखाद्या कार्यकर्त्यांला हाताशी धरून त्याच्या नावाने उलट सुलट बातमी टाकून बदनामी करून अव्वाच्या सव्वा पैसे मागण्याचे धमकवण्याचे प्रकार वाढले असून अधिकारी वर्ग त्रासला आहे.

    या आधी बाहेरच्या जिल्ह्यातील बोगस पत्रकार माहिती अधिकार टाकून अधिकारी वर्गाला त्रास देत होते पण आता चोपडा तालुक्यातील च काही बोगस पत्रकार असे प्रकार करीत असल्याचे बघायला मिळतेय. मोटरसायकल व फोर व्हीलर वर प्रेस लिहिणाऱ्या बोगस पत्रकारांची ही संख्या वाढल्याने खऱ्या पत्रकारांची कुचंबना बघायला मिळत आहे.त्यामुळे खरे पत्रकार कोण आणि खोटे पत्रकार कोण हा प्रश्न उपस्थित होतोय.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष व पत्रकार मिलिंद सोनवणे हे लवकरच जिल्हाधिकारी आयुष् प्रसाद यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.

No comments