सातपुडा जंगलातील वृक्षतोडीची चौकशी करून कारवाई करणार.... आरएफओ बी के थोरात यांची माहीती. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा...
सातपुडा जंगलातील वृक्षतोडीची चौकशी करून कारवाई करणार....
आरएफओ बी के थोरात यांची माहीती.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा :- तालुका हा सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेला असून फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी बहुतेक अवैध वृक्षतोडी संदर्भात कठोर पाऊल उचलली आहेत.तरी सुद्धा उमरटी व गौऱ्या पाडा येथे काही अज्ञात लोकांनी दहा ते बारा सागवान झाडांची अवैधरित्या वृक्षतोड केल्याची माहीती समोर येत असून त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असं रेंज ऑफिसर बी के थोरात यांनी सांगितले.
नुकतेच काही लोकांनी खात्री न करता खोट्या बातम्या दिल्याचे ही थोरात यांनी सांगितले व आमचे कर्मचारी अधिकारी सतत जंगलात असतात व कोणीही चुकीचा प्रकार अफवा पसरवत असतील तर असा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नसल्याचे ही थोरात यांनी सांगितले.
No comments