adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माझं कुंकू, माझा देश" — पाकिस्तानविरोधात महिला आघाडी रस्त्यावर.. भारत-पाकिस्तान मॅचच्या विरोधात खामगावमध्ये तीव्र आंदोलन

 माझं कुंकू, माझा देश" — पाकिस्तानविरोधात महिला आघाडी रस्त्यावर.. भारत-पाकिस्तान मॅचच्या विरोधात खामगावमध्ये तीव्र आंदोलन  अमोल बावस्का...

 माझं कुंकू, माझा देश" — पाकिस्तानविरोधात महिला आघाडी रस्त्यावर..

भारत-पाकिस्तान मॅचच्या विरोधात खामगावमध्ये तीव्र आंदोलन 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खामगाव:- एकीकडे आज दुबई येथे भारत विरुद्ध पाकिस्तान हा बहुचर्चित सामना खेळवला जात आहे, तर दुसरीकडे या सामन्याच्या विरोधात देशभरात संतापाचे वातावरण आहे. पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी दिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी तर्फे आज "माझं कुंकू, माझा देश" या भावनिक घोषवाक्याखाली राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून खामगाव तालुका,  येथे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली."जवान मरत आहेत, आणि इथे खेळ सुरु आहे?" असा सवाल आंदोलकांनी उपस्थित करत केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध केला. दरम्यान, आज Asia Cup 2025 अंतर्गत दुबईच्या Dubai International Cricket Stadium वर संध्याकाळी ६:३० वाजता (UAE वेळेनुसार) भारत-पाकिस्तान यांच्यात टी-२० सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे.दुबईच्या संतुलित खेळपट्टीवर बॅट्समन आणि बॉलर्स दोघांनाही संधी मिळेल, अशी शक्यता असून हवामान उष्ण असले तरी संध्याकाळचे वातावरण खेळासाठी अनुकूल आहे. तिकीट विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, स्टेडियम हाऊसफुल्ल होण्याची शक्यता आहे.एका बाजूला भारत-पाकिस्तान क्रिकेटचा जल्लोष, आणि दुसऱ्या बाजूला देशभक्तीतून निर्माण झालेला रोष."क्रिकेटपेक्षा देश महत्त्वाचा" हा संदेश देत महिलांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून, अशा परिस्थितीत मॅच खेळणं हे शहिदांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं मत आंदोलनकर्त्यांनी मांडलं.या उपस्थित श्रुतीताई पतंगे तालुकाप्रमुख महिला आघाडी पल्लवी पाटील उपशहर प्रमुख सुरेखाताई चिलवन उप तालुकाप्रमुख जया ताई पाटील  निंबाळकर ताई मीनाक्षी वराडे वैशालीताई तायडे रंजनाताई राठोड  सविता पवार श्रीराम खेलदार तालुकाप्रमुख रवी भाऊ जैन शहर प्रमुख राहुल मानमोडे युवासेना ता. प्रमुख संतोषभाऊ रामेकर उपस्थित होते. 

No comments