adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लेवा शुभमंगल व लेवायुथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा गौरव सोहळा २०२५ जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात कार्यक्रम उत्साहात

  लेवा शुभमंगल व लेवायुथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा गौरव सोहळा २०२५  जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात कार्यक्रम उत्साहात ...

 लेवा शुभमंगल व लेवायुथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा गौरव सोहळा २०२५ 

जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात कार्यक्रम उत्साहात 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 फैजपूर लेवा युथ फोरम व लेवा शुभमंगल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेवा गौरव सोहळा  २०२५ हा प्रेरणादायी व भव्य सोहळा जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेज फैजपूर येथे मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकतेचे दर्शनघडवत संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा गौरव–समाजाचा अभिमान या सोहळ्यात समाजातील १५० गुणवंत विद्यार्थी  तसेच विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या ४० समाज बांधवांचा  सन्मान करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धा परीक्षा व इतर कौशल्यांमध्ये विशेष कामगिरी  करणाऱ्या या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे व पारितोषिके  प्रदान करण्यात आली. या सन्मानाने  केवळ व्यक्ती नव्हे तर संपूर्ण लेवा समाजाची शैक्षणिक प्रगती अधोरेखित झाली. या गुण गौरव पुरस्कार सोहळ्यास आमदार अमोल  जावळे, तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव  विजय झोपे, सहसचिव शशिकांत चौधरी,डॉ.सौ. केतकीताई पाटील, समाज प्रबोधनकार  व. पू. होले , लेवा युथ फोरमचे संस्थापक अध्यक्ष हर्षल भंगाळे, लेवा शुभमंगल चे संस्थापक अध्यक्ष हर्षल  जावळे, यावल तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पांडुरंग सराफ,उद्योजक मनोज पाटील, टेनू बोरोले, जिल्हा दूध संघाचे संचालक  नितीन चौधरी, प्राचार्य डॉ. के.जी.पाटील , उपप्राचार्य डॉ. जी.ई.चौधरी, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे , शुभम महाजन यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, प्रामाणिक परिश्रम आणि समाजसेवा या मूल्यांच्या आधारे उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा संदेश दिला. सदर कार्यक्रमास ४५० हून अधिक समाज बांधवांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेवा युथ फोरम व लेवा शुभमंगल टीमने संघटित प्रयत्न केले. त्यात चेतनाताई जावळे, किरण  राणे, अतुल महाजन, हितेश भोळे, पूनम चौधरी, कीर्ती बोरोले, लाजरी भोळे, नम्रता राणे, रोशनी वाणी, चेतन महाजन, कुशल खडसे, संजय नेमाडे, धीरज बोरोले, मृणाल चौधरी व मोहन चौधरी यांनी सेवाभावाने व परिश्रमपूर्वक योगदान दिले. त्यांचे हे योगदान समाजातील  एकता, बांधिलकी व प्रेरणादायी कार्यसंस्कृतीचे प्रतीक ठरले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस चौधरी यांनी केले.कार्यक्रमासाठी संपूर्ण जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेज टीम फैजपूर व नरेंद्र नारखेडे मनोज पाटील, सिद्धेश्वर वाघुळदे  यांचे विशेष सहकार्य लाभले‌. ज्यामुळे हा उपक्रम अधिक सुयोग्य व संस्मरणीय ठरला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी  दिलेल्या योगदानाबद्दल प्रत्येक समाज बांधवांचे आभार मानले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

लेवा गौरव सोहळा - २०२५ केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम न राहता, समाजाच्या सामूहिक शक्तीचा, विद्यार्थ्यांच्या यशाचा आणि भावी पिढ्यांच्या प्रेरणादायी वाटचालीचा दीपस्तंभ  ठरला. अशा कार्यक्रमातून अनेक विद्यार्थी प्रेरणा घेतील  अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली.

No comments