चोपड्यात धनगर समाजाच्या वतीने एस टी प्रवर्गाचे आरक्षण लागु करण्यासाठी निवेदन देवुन मागणी. चोपडा (प्रतिनिधी)/ विश्राम तेले चौगाव (संपादक ...
चोपड्यात धनगर समाजाच्या वतीने एस टी प्रवर्गाचे आरक्षण लागु करण्यासाठी निवेदन देवुन मागणी.
चोपडा (प्रतिनिधी)/ विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर धनगर समाज वेळोवेळी आंदोलन करत आहे उपोषण करत आहे त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, धनगर समाजाच्या जमातीला लागु असलेले आरक्षण संदर्भात अंमलबजावणी करावी तसेच जालना येथे घटनादत असलेले एस टी प्रवर्गाचे आरक्षण लागु करण्यात यावे यासाठी ११ दिवसापासुन उपोषणाचे आंदोलन करीत असलेले दिपक बोर्हाडे यांना पाठींबा देण्यासाठी व त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी. यासाठी तालुका धनगर समाजाच्या वतीने नायब तहसीलदार प्रकाश कचरे यांना निवेदन देवुन मागणी करण्यात आली.तसेच आगामी काळात आंदोलन तिव्र करण्याच्या इशारा देण्यात आला.यावेळी पं स माजी सभापती आत्माराम म्हाळके,माजी नगरसेवक महेंद्र धनगर, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे, मोर्या क्रांतीचे आर सी भालेराव,रा स पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण सावळे, शेतकी संघाचे व्हा चेअरमन सचिन धनगर, नंदलाल धनगर डॉ अशोक कंखरे,डि एस धनगर,शाम धामोळे, भगवान नायदे, डॉ सुभाष शिरसाठ,सुरेश शिरसाठ, रविंद्र धनगर,लहुष नायदे,परेश धनगर, चंद्रकांत धनगर,शेखर धनगर, विश्राम तेले सह तालुक्यातील समाजाचे सर्व पक्षीय नेते ,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments