छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंघरवडा अंतर्गत तालुका स्तरीय शिबीर..! चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) 🛡...
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंघरवडा अंतर्गत तालुका स्तरीय शिबीर..!
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
🛡️ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंघरवडा अंतर्गत तालुका स्तरीय शिबीर..! चोपडा ता. चोपडा | दिनांक 27 सप्टेंबर 2025 | स्थळ- न. प नाटयगृह, चोपडा ता. चोपडा येथे राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 02 ऑक्टोबर 2025 दरम्यान सेवा पंघरवडा अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा तालुका स्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन मा. प्रा. आ. श्री चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले.
✅ नागरिक सहभाग व लाभ- शिबिरात 1800 ते 2000 नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.
👥 उपस्थित मान्यवर श्री. नरेंद्र पाटील, कृउबा सभापती चोपडा, श्री. नामदेव पाटील, अध्यक्ष् लाडकी बहीण योजना, चोपडा, श्री. दिपक चौधरी व इतर
अधिकारी- श्री. भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, श्री. एन. आर. पाटील , प्रभारी गट विकास अधिकारी, श्री.रामनिवास झ्वर, प्रभारी मुख्याधिकारी न. प चोपडा, श्री दीपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी, श्री. मधुकर सावळे, पोलिस निरीक्षक चोपडा शहर पो. स्टे, श्री. महेश टाक, पोलिस निरीक्षक चोपडा ग्रामीण पो. स्टे, श्री. प्रमोद वाघ सहा.पोलीस निरीक्षक अड़ावद पोलीस स्टेशन, डॉ. प्रदिप लासुरकर, तालुका वैदयकीय अधिकारी, श्री. विरेंद्र राजपुत, उपविभागीय अभियंता, चोपडा, श्री. महेंद्र पाटील, आगारप्रमुख चोपडा, श्री. शाम येवडा, उपविभागीय अभियंता हतनुर प्रकल्प, चोपडा, श्री.योगेश पाटील, निवासी नायब तहसिलदार, श्री. सैंदाणे, नायब तहसिलदार, श्री. धनगर, नायब तहसिलदार, श्री. एस.एल. पाटील, नायब तहसिलदार, श्रीमती मेश्राम, पुरवठा अधिकारी व महावितरणचे अभियंता , ग्रामीण पाणीपुरवठा, सर्व तालुका स्तरीय अधिकारी, व सर्व महसुल यंत्रणा उपस्थित होते.
🎤 कार्यक्रम संचालन व समारोप- सूत्रसंचालन श्री. भूषण पाटील आणि स्वप्नील कुलकर्णी यांनी केले.
💬 विशेष नोंद- या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली.



No comments