सांगली हादरली, चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या ; तर पती स्वता: हून पोलीस ठाण्यात हजर... पोलिसांची घटनास्थळी धाव..!! सौ....
सांगली हादरली, चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या ; तर पती स्वता: हून पोलीस ठाण्यात हजर... पोलिसांची घटनास्थळी धाव..!!
सौ. प्रियांका देशमुख ( सांगली जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कुटुंबामध्ये नेहमीच सर्वांसाठी फ्री. वातावरण हे नक्कीच असलं पाहिजे आपल्या मनात कधीही संशय हा नसावा, आपल्याच पत्नीचा संशय मनात फिरल्यामुळे अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातून समोर आली आहे. आपल्या पतीने चारित्र्याच्या आणि कौटुंबिक वादांतून मोल मजुरी करणारा पती प्रशांत एडके यांने पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार तिची हत्या केली आहे. पत्नी सौ. काजल प्रशांत एडके (वय 28 ) हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना सांगलीच्या खणभागातील शांतीनगर येथे घडली आहे. खुनानंतर पती प्रशांत याने सांगली शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन हा प्रकार सांगितला यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून प्रशांत एडके हा मोल मजुरीचे काम करतो मागील काही वर्षांपूर्वी काजल हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. दोन मुलीसह शहरांतील शांतीनगर येथे ते वास्तव्यास होते. काजल आणि प्रशांत यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यावरून काजल हिच्या चारित्र्याचा संशय प्रशांतच्या मनात चांगलाच फिरत होता. त्यावरून सतत दोघांमध्ये वाद होत होते. त्यामुळे प्रशांतने ( 16 सप्टेंबर ) रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली होती. मात्र पोलिसांनी तिचा शोध घेवुन पुन्हा तिला परत आणले होते. काजल परत आल्यानंतर प्रशांतने तिची समजूत काढली होती. तरीही त्यांच्यात वाद सुरूच होते. काजलने मी घर सोडून जाणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून रविवारी सकाळी पुन्हा वाद झाला. रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारांस काजल घरातील सर्व कामे आवरून झोपी गेली होती. यावेळी प्रशांत घरी आला त्याने धारदार हत्यारांने काजलच्या गळ्यावर चार ते पाच वार केले या हल्ल्यात गंभीर झालेली काजल रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या खुनानंतर प्रशांत याने दोन्ही मुलींना काही अंतरावर राहत असलेल्या आईकडे सोपवले होते. त्याने पत्नीचा खून करून आल्याचे सांगली शहर पोलिसांना सांगताच पोलिसांची देखील धावपळ उडाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पथकांसह घटनास्थळी गाठले यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर सहायक पोलीस अधीक्षक विमला.एन यांनी घटनास्थळी भेट देवुन तपासाच्या सूचना केल्या.
No comments