adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खडसे महाविद्यालयात 'अग्निवीर सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण' अभियानाचा शुभारंभ

 खडसे महाविद्यालयात 'अग्निवीर सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण' अभियानाचा शुभारंभ   सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 खडसे महाविद्यालयात 'अग्निवीर सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण' अभियानाचा शुभारंभ  


सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग व युवती सभेच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसीय भरतीपूर्व प्रशिक्षण अभियान २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक 29 सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स परिसरात महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन यांच्या हस्ते 'अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण' अभियानाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना या अभियानाचे महत्त्व सविस्तर सांगितले. “भरतीपूर्व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि देशभक्ती वृद्धिंगत होते. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभियानात सहभागी व्हावे,” असे आवाहन याप्रसंगी केले.

पहिल्या सत्रात श्री शशिकांत भा. सोनवणे सर (एम. ए. नारखेडे विद्यालय, रुईखेडा) यांनी “क्रीडांगण शारीरिक प्रशिक्षण” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले तसेच व्यसनमुक्तीचे धडे दिले. प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना क्रीडासंशोधनाची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे परेड घेऊन मूल्यमापनासह मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात प्रा. योगिता झांबरे (जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर) यांनी “देशसेवा हेच आमचे सर्वोच्च कर्तव्य” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की युवकांनी संघटित होऊन देशसेवेचे कार्य करणे अत्यावश्यक आहे. देशसेवा ही केवळ भावना नसून ती आपल्या कृतीतून दिसली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

 या अभियानाच्या पहिल्या दिवशी सुमारे ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

या उद्घाटन प्रसंगी  महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजीव साळवे, प्रा. डॉ. वंदना चौधरी, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी प्रा. डॉ. अतुल बढे, युवती सभा समन्वयक प्रा. डॉ. सुरेखा चाटे तसेच युवती सभा समितीचे सर्व सदस्य आणि प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अतुल बढे यांनी केले. त्यांनी अभियानाचा हेतू, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांना होणारे फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सूत्रसंचालन कुमारी कल्याणी डापके तर आभार प्रदर्शन कुमारी भूमिका भोई यांनी केले. या अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाला चालना मिळणार असून, भविष्यातील  तेजोमय कारकिर्दीसाठीही हा अनुभव अत्यंत मोलाचा ठरेल, असा विश्वास सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला .

No comments