adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस सज्ज; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई ; पोलीस अधीक्षक तुषार दोशी..!!

 गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस सज्ज; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई ; पोलीस अधीक्षक तुषार दोशी..!!   सौ. संगिता इंनकर ( सातार...

 गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस सज्ज; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई ; पोलीस अधीक्षक तुषार दोशी..!!  


सौ. संगिता इंनकर ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा पोलीस दलाने देखील तगडा बंदोबस्त ठेवला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई तसेच शांतता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कडक नजर ठेवण्यात येणार आहे. (बंदोबस्तातील प्रमुख पैलू ) विसर्जन मिरवणुका आणि उत्सवांदरम्यान पोलिसांची बारकाईने नजर राहणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई उत्सवांच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर विशेषतः विसर्जन मिरवणुकीत नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, ( अंमलबजावणीची सज्जता ) सातारा पोलीस दलाने उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. ज्यामुळे शांतता व सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल, ( गुन्हेगारी रोखण्यासाठी कारवाई ) गणेशोत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 1583 जणांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये 15 जणांना तडीपार करण्यात आले आहे. उत्सवांत नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तसेच  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहे असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. गणपती, तसेच ईद-ए मिलाद या सणासाठी जिल्ह्यात एक पोलिस अधीक्षक एक अप्पर पोलीस अधीक्षक आठ पोलीस उपाधीक्षक व 140 पोलीस अधिकारी10,840 पोलीस अंमलदार एक राज्य राखीव पोलीस दलाचे पथक ( सीआरपी कंपनी ) तीन जलद कृती दल पथक 1,100 गृह रक्षक असे मनुष्यबळ बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे. असेही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. पारंपारिक वाद्याचा वापर करून आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिमय शांतता मुक्त अशा वातावरणामध्ये बाप्पांना निरोप द्या आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

No comments